भंवरलाल जैन

भंवरलाल जैन
X

जैन उदयोग समुहाचे अध्यक्ष पद्मश्री भंवरलाल जैन म्हणजेच मोठे भाऊ यांचा 25 फेब्रुवारी 2017 शनिवार हा पहिला श्रद्धावंदन दिन. अजिंठयांच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील वाकोद या छोट्याशा गावातून आपल्या कामाची सुरूवात करणाऱ्या भंवरलालभाऊ यांचा प्रवास थक्क करणारा आहे. 7000 रूपयंपासून सुरु केलेला शेती उद्योग आता भारतासह देशा-विदेशात जाऊन तब्बल 7000 कोटीपर्यंत पोहचला. अमेरिका, इस्रायल सारख्या देशात काही बंद पडलेले कारखाने आता त्यांच्या उद्योग समुहानं विकत घेऊन सुरू केले आहेत. आपल्या उद्योगाचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहचवता येईल हेच उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवून ते जगले.

शेती शाश्वत करण्यासाठी शेतकऱ्याला त्याचं शेत कारखान्यात रुपांतरित करता आलं पाहिजे असं आदरणीय भाऊ नेहमी म्हणायचे. त्यासाठी 24 तास ऊर्जा उपलब्ध असणं नितांन आवश्यक आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरी हायब्रिड सिस्टीम वर काम करत असलेली ‘बीजे ऊर्जा’ शेतकऱ्याला याबाबत आत्मनिर्भर करण्यासाठी कार्यरत आहे. ‘बीजे उर्जा’ स्व. भंवरलाल जैन यांना आदरांजली अर्पण करत आहे.

- सिद्धार्थ मयूर, संस्थापक व सीईओ, बीजे उर्जा

भंवरलाल जैन यांनी शेतकरी समृद्ध करण्याचा एकच ध्यास घेतला आणि तो तडीस नेला. भविष्यातील पाण्याची कमतरता आणि गरज पाहता पाण्याचा एक एक थेंब शेतीसाठी कसा वापरता येईल यासाठी ठिबक सिंचन पद्धत शेतकऱ्यापर्यंत नियोजनबद्ध पोहचवली. माळरानावर सुद्धा पाण्याच्या एक एक थेंबाचा उपयोग करुण शेती बहरवता येत नाही तर भरघोस उत्पन्न ही मिळत हे शेतकऱ्यांना त्यांनी पटवून दिल.

समाजाचं देणं लागतो या भावनेतून भवरलाल जैन यांनी त्यांच्या कमाईतून सामाजिक आणि सांस्कृतीक क्षेत्रांत मोलाचं योगदान दिलं. देश भरातील उदयोग समुहांच्या सीएसआर निधी खर्चात जैन उदयोग समुहचा 89 नंबर लागतो हे विशेष.

महात्मा गांधींच्या विचारांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीच "गांधी तीर्थ" हे म्युझिअम जळगावात उभारलं. आज जगभरातील पर्यटक आवर्जून याठिकाणी भेट देतात.

आज त्यांचे चारही पुत्र अशोक जैन, अनील जैन, अजित जैन आणि अतुल जैन त्यांचा वारसा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

योगिता सोनवणे, जळगाव

Updated : 25 Feb 2017 7:42 AM GMT
Next Story
Share it
Top