Home > मॅक्स ब्लॉग्ज > नवे वर्ष भाजपाच्या नव्या भरारीचे

नवे वर्ष भाजपाच्या नव्या भरारीचे

नवे वर्ष भाजपाच्या नव्या भरारीचे
X

पाहता पाहता २०१७ साल संपले. आता आपण २०१८ मध्ये प्रवेश करीत आहोत. व्यक्तीप्रमाणेच संस्था, राजकीय पक्ष यांच्यासाठी सरत वर्ष हे जसं काही झोळीत घालून गेले तसंच नवं वर्ष काय देणार? याचा अंदाजही सरत्या वर्षातील घडामोडींनी येतो.

भाजपासाठी २०१८ हे नवे वर्ष सरत्या वर्षाप्रमाणेच महत्त्वाचे ठरेल. केंद्रात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यापासून २०१७ हे सर्वात कठीण आणि संघर्षाचे वर्ष होते. खरंतर गेल्या ३ वर्षात जवळपास २३ राज्यात निवडणूका झाल्या आणि बिहार दिल्लीचा अपवाद वगळता भाजपाचा आलेख हा सतत चढता राहिला. मोदींजीची कार्यक्षमता तसेच लोकप्रियता आणि विश्वासर्हता हे गेल्या तीन वर्षाचे वैशिष्ट्य. हे सरकार विकासासाठी निवडून आले होते. भ्रष्ट्राचार काळा पैसा या विरोधात भाजपाची ठाम भूमिका आहे. स्वाभाविकपणे सत्तेवर येताच मोदींजीनी त्या दृष्टीकोनातून ठोस निर्णय घेतले. गेल्या वर्षी नरेंद्र मोदींजी यांनी नोटाबंदीसारखा धाडसी पण देशासाठी आवश्यक असणारा निर्णय घेतला. त्यानंतर या वर्षी जीएसटीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला. जीएसटीच्या रुपाने देशासमोर एक नवी करप्रणाली आणण्यात आली. नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन्ही निर्णय हे देशासाठी दूरगामी फायदेशीर ठरणार असले तरी तात्कालिक अडचणी निर्माण करणार होते. समस्या निर्माण होणार होते. तशा त्या झाल्याही. लोकांना रांगेत उभा रहावं लागल, जीएसटीआल्यानंतर व्यापारी वर्गाला अडचणीचा सामना करावा लागला. पण देशांतील सामान्य जनता मोदींच्या नेतृत्वावर लोकांनी ठामपणे विश्वास दाखवित या निर्णयाच्या पाठिशी उभी राहिली. मोदींजीच्या निर्णयांची पहिली परिक्षा अर्थातच जानेवारी २०१७ पासून देशाच्या विविध भागांत झालेल्या निवडणूकीपासून सुरू झाली. विरोधकांनी मुद्दे सोडून खूप खालच्या स्तरावर प्रचार केला पण २०१७ मध्ये देशाच्या विविध भागांत झालेल्या निवडणूकीत भाजपाला जनतेने भरभरून मतदान करीत देशांतील जनतेने मोदींजीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. उत्तर प्रदेश विधानसभा तर भाजपाला घवघवीत यश मिळाले. महाराष्ट्रातही वर्षभरात स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झाल्या. या सर्व निवडणूकात भाजपा क्रमांक १ चा पक्ष बनला. तळागाळाप्रर्यत भाजपाचीमुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातीदेंवेद्र फडणवीस सरकारयांच्या कार्यकुशलतेमुळे भाजपाचा महाराष्ट्रात झाला. नुकत्याच झालेल्या गुजरात आणि हिमाचलच्या विजयाने भाजपासाठी या वर्षांची यशस्व सांगता झाली.

येणाऱ्या वर्षात काही राज्यांच्या निवडणूका आहेत आणि अर्थातच ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची बाब आहे. सुरूवातीला कर्नाटक आणि ईशान्येतील छोट्या राज्यांच्या निवडणूकांनी भाजपाची राजकीय लढाई सुरू होईल. वर्षअखेरीस राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणूका असणार आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात भाजपा सत्तेवर आहे. दीर्घकाळ सत्तेवर असल्यामुळे एक प्रकारची अँन्टी एनक्बन्सी निर्माण होते, प्रस्थापितविरोधी मानसिकता बनते, अशा प्रकारचा सिध्दांत मांडला जातो पण भाजपाने सुशासन आणि कार्यकर्त्यांच्या बळावर अँन्टीइनकब्न्सिीला प्रो - इनक्नब्न्सी मध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे भाजपा आपला यशाची पुनरावृत्ती करेल.

एका अर्थाने २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे वर्ष असेल. त्यामुळे राजकीय यशाच्या विस्ताराला संघटनात्मक बळकटीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. सत्ता हे साध्य नाही तर समाज परिवर्तनाचे साधन आहे, ही भाजपाची भूमिका आहे. त्यामुळे विकासाची भूमिका आणि परिवर्तनाचा वसा घेतलेले मजबूत संघटन यादृष्टीने ठोस पावले पडतील.

नोटाबंदी आणि जीएसटीच्या तात्कालिक अडचणी आणि समस्यातून बाहेर पडून आता देश नव्या दिशेने जात आहे. २०१८ त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मधल्या काळात घसरलेला जीडीपी परत उंचावत चालला आहे. त्याशिवाय गेल्या साडे तीन वर्षात पायाभूत सोयीसुविधांची काम सुरू झाली त्याची दृष्य परिणाम आता या वर्षात दिसायला सुरूवात होईल. एक बदलता भारत - विकासाच्या वाटेवरचा भारत हे चित्र आता दिसायला लागेल. त्यामुळे कुठे आहे विकास याला थेट उत्तर मिळेल. महाराष्ट्रातही जलशिवार सारख्या योजनांनी ग्रामीण भागांत परिवर्तन केले आहे. तर जलसिंचन आणि रस्त्याची विक्रमी कामे या वर्षात पूर्ण होताना दिसतील.

सरत्या वर्षातील आव्हानांवर तसेच खोट्या प्रचारावर मात करीत राजकीय यश भाजपाने मिळवले. दिसणारी विकास कामे, येत असलेला जीडीपी, उत्तम मान्सुन आणि हमीभावामुळे शेतकऱ्याला मिळणारा दिलासा आणि सक्षमसंघटन या आधारे गेल्या वर्षाच्या राजकीय यशाची पुनरावृत्ती करीत भाजपा २०१९ च्या लोकसभा जिंकण्यासाठी सज्ज झालेला असेल यांत शंका नाही.

केशव उपाध्ये

(लेखक भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व प्रदेश प्रवक्ते आहेत.)

Updated : 30 Dec 2017 10:02 AM GMT
Next Story
Share it
Top