Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोण आहेत रामनाथ कोविंद?

कोण आहेत रामनाथ कोविंद?

कोण आहेत रामनाथ कोविंद?
X

बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एनडीएच्या सर्व घटकपक्षांना ही माहिती देण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. रामनाथ कोविंद 23 जूनला उमेदवारी अर्ज भरतील.

शहा म्हणाले रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचं एकमत झाले आहे .

'रामनाथ कोविंद मूळ उत्तप्रदेशमधील कानपूरचे असून दलित प्रवर्गातले आहेत. संघर्ष करुन रामनाथ कोविंद आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. रामनाथ कोविंद 12 वर्ष राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशचे महासचिवदेखील होते'. अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी बातचीत करत नाव कळवलं', असल्याची माहिती शहा यांनी दिली आहे.दलित समाजातील नेत्याला उमेदवारी देऊन, राष्ट्रपतींची निवड बिनविरोध व्हावी, याची मोर्चेबांधणीच भाजपनं केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

कोण आहेत रामनाथ कोविंद?

  • रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
  • कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण
  • 1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
  • 1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
  • भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
  • भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
  • 8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत

सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.

Updated : 19 Jun 2017 10:08 AM GMT
Next Story
Share it
Top