गुरमेहर कौर खोटी प्रसिद्धी की अन्य काही !

827

सध्या समाजमाध्यमं असतील वा प्रसिद्धी माध्यमं यावर एकच चर्चा आहे ती म्हणजे शहीद जवानाची कन्या भगिनी गुरमेहर कौर हिची. तिने जे फेसबुक आणि ट्विटरला “मी ABVP ला घाबरत नाही आणि माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले आहे”, वगैरे पोस्टर हातात घेवून जोरदार प्रदर्शन केलं. रात्रीत प्रसिद्ध झालेल्या गुरमेहरच्या या मार्गाचं नवल वाटतं आणि खंत ही. तिने तिच्या शब्दात म्हटलंय की ती ABVP ला घाबरत नाही. मी तेच म्हणतो. बरोबर आहे आणि ABVP ला देशभरात कोणीही घाबरत नाही आणि का घाबराव? कारण ABVP सुद्धा विद्यार्थ्यांची राष्ट्रभक्त संघटना आहे. “भारत माता की जय” अशा घोषणा देणाऱ्या ABVP ला का घाबराव असा प्रश्न माझ्या मनात येतो. घाबरायचंच असेल तर “भारत की बर्बादी” आशा घोषणा देणाऱ्या देशद्रोही लोकांना घाबरावं लागेल. गुरमेहरजी जी ABVP म्हणते “खून भी देंगे, जान भी देंगे, देश की मिट्टी कभी नही देंगे” त्यांना का घाबरावं? तुम्ही बरोबर आहात. खरं तर “कश्मीर की आझादी आणि भारत की बर्बादी” या घोषणा देणाऱ्या डाव्यांना घाबरावं लागेल.

आपल्याला माहीत असेल वा नसेल परंतु आपण ABVP चा इतिहास ही पहावा, की ही तीच ABVP आहे ज्या ABVP चे 10,000 पेक्षा जास्त कार्यकर्ते नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये तिरंगा जाळला त्यावेळी “जहाँ हुआ तिरंगे का अपमान, वही करेंगे तिरंगे का सम्मान” म्हणत काश्मीरमध्ये जीवाची पर्वा न करता श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फड़कवून आले होते. हा ABVP चा इतिहास आहे. त्यामुळे गुरमेहरजी आपण ABVP ला अजिबात घाबरलं नाही पाहिजे. तुमचे पिताजी ज्या भारतमातेसाठी शहीद झाले आहेत, त्यासाठीच ABVP माँ रक्षणासाठी कार्यतत्पर आहे. गुरमेहरजी आपण जे वक्तव्य ABVP बद्दल केलं याबददल माझी अजिबात तक्रार नाही. परंतू आपल्या वक्तव्याचा फायदा आणि आपल्या शहीद जवानकन्या या सर्वोच्च बहुमान प्राप्त आशा गोष्टीचा फायदा हे कम्युनिस्ट लोकं जे काश्मीरमध्ये भारतीय सेनेवर दगडफेक करणाऱ्या फुटिरवादी लोकांचं समर्थन करतात. याचं दुःख आपले दिवंगत शहीद पिता यांनाही वाटत असेल. त्यामुळे जी ABVP स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानते, त्या ABVP ला आपण का घाबराव. जर घाबरायचे असेल तर लाखो लोकांचे बळी   घेणाऱ्या, स्टेलिन माओ यांचा जयजयकार करणाऱ्या देशद्रोही कम्युनिस्ट लोकांना घाबरावं लागेल. जे देशाचे तुकड़े करण्याचं स्वप्न पहात आहेत.

गुरमेहर कौरजी आपल्याला जर घाबरायचं असेल तर आपण हजारो आदिवासी, दलितांच्या हत्या करणाऱ्या, नक्षलवादाचं खुलं समर्थन करणाऱ्या कम्युनिस्ट लोकांना घाबरायला हवे. आपल्याला घाबरायचंच असेल तर संसद हल्ल्यातील आतंकवादी अफजल गुरु याचं गेल्यावर्षी वर्षश्राद्ध साजरं करणाऱ्या डाव्या आतंकवादी संघटना ज्या लाल सलाम म्हणत म्हणत गांज्या पिणाऱ्या आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एस. एफ. आय. आणि AISA या संघटनेला घाबरावं लागेल. जे नक्षलवादी बिहार,  आंध्रप्रदेश,  पश्चिम बंगाल,  ओडिसा,  आसाम, महाराष्ट्र,  छत्तीसगढ़ याठिकाणी हजारो CRPF च्या जवांनाना शहीद करतात आणि त्यांना हे कम्युनिस्ट पाठिंबा देतात. विद्यापीठात यांना घाबरावं लागेल. गुरमेहरजी आपणास देशभक्त जी अभाविप म्हणते, “नक्षलवाद हो बरबाद”, जी ABVP म्हणते “भारत माता की जय” यांना मुळीच घाबरायची गरज नाही. देशभरातील करोड़ो युवकांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग जागृत करणा-या ABVP ला घाबरायची अजिबात गरज नाही. गुरमेहरजी घाबरायचंच असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर देशाचे तुकड़े करण्याच्या घोषणा विदयापीठात देणा-या, डाव्या, रक्तरंजित इतिहास असणा-या लोकांना गुरमेहर तुला घाबराव लागेल. भारताला विश्वगुरु बनवायचा ध्यास घ्येउन कार्यरत असणा-या राष्ट्रभक्त ABVP ला घाबरु नका, तर बंदुकीच्या नळी मधून सुटना-या गोळीच्या जोरावर भारताचे तुकडे करण्याचे स्वप्न बाळगना-या डाव्या देशद्रोह्यांना घाबरावं लागेल. गुरमेहर तू ABVP च्या विरोधात उभी आहे, याचं मला काही विशेष वाटत नाही. पण तू त्या डाव्या लोकांच्या विरोधात तर उभी राहू नको, ज्या डाव्यांनी दंतेवाड़ा मध्ये CRPF चे ७६ जवान नक्सलवाद्यांनी शहीद केल्यावर जल्लोष केला होता. गुरमेहर तू ABVP चा विरोध नक्की कर परंतू राष्ट्रद्रोही डाव्यांच समर्थन करू नकोस आणि हो ABVP चे कार्यकर्तेही कोणाला घाबरत नाहीत आणि खासकरुन देशद्रोही आतंकवादी डाव्यांना तर मुळीच नाही.

कालपरवा पुण्यामध्ये सुद्धा या डाव्या लोकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जेएनयू करण्याचा प्रयत्न केला. परंतु अभाविपने तो हाणून पाडला. यामुळे काही जहाल अतिडाव्या पत्रकारांना त्रास झाला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कलमं स्पष्टीकरणासहीत वर्तमान पत्रात छापलेली दिसू लागली. संविधानविरोधी डावे जेव्हा संविधानाच्या कलमांचा वापर राष्ट्रद्रोही काम करायला वापर करतात त्यावेळी अभिव्यक्तीच्या कलमाचा खरा अर्थ काय आहे हे समजावून सांगण्यचं कर्तव्य ABVP ने सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठात केलं आहे.

शेवटी एकच म्हणेन,

“जिस कश्मीर से खून से सींचा वह कश्मीर हमारा है,

जहाँसे हमने भगत गंवाया वह पंजाब हमारा है,

नही नही जहांगीर किसी की वह आसाम हमारा है,

प्राणो से भी प्यारा हमको हिंदुस्तान हमारा है”

 

– राम सातपुते, प्रदेशमंत्री ABVP महाराष्ट्र