कायदे सोशल मीडियाचे !

6220

सोशल मीडिया हे देशातल्या तरुणाईचं आता पहिलं प्रेम झालंय. तरूण मंडळी दिवसातले किमान ४ तास सोशल मीडियावर घालवतात. वयस्क आणि महिला सुद्धा आजकाल त्यात मागे नाहीत. सोशल मीडिया गरज पण आहे आणि फॅशन सुद्धा. अशातच तो अव्हॉईड करणं पुरतं कठीण झालंय. त्यासाठीच त्याबाबतचे कायदे लक्षात असणं फार महत्त्वाचं आहे.

सोशल मीडियाबद्दल आय-टी कायद्यातील काही तरतुदी:

माहिती तंत्रज्ञान नियम-2000 आणि सायबर विनियम अपील न्यायाधिकरण (कार्यपद्धती) 2000 हा सायबर कायदा गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून संमत करण्यात आला.
कलम-66 : एखाद्यास बदनामीकारक, खोडकर संदेश पाठविणे किंवा एखादी खोटी माहिती पसरविणे ज्यामुळे कुणाची अडचण, कुंचबणा होणे, धोका निर्माण होऊन त्रास, मानहानी, इजा होणे, आकस, शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते किंवा द्वेषभावना वाढीस लागू शकते किंवा एखाद्या संदेशाचे मूळ स्रोत लपविणे किंवा खोटे भासविणे अशा कृती केल्यास तीन वर्षे कैद आणि दंडाची तरतूद आहे.
कलम-66 सी : दुसऱ्याचा पासवर्ड चोरी करणे, त्याच्या परवानगीशिवाय वापरणे, डिजिटल हस्ताक्षर व फिंगर प्रिंटचा गैरवापर यासाठी तीन वर्षे आणि शिक्षा एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
कलम-66 डी : दुसऱ्याचा डुप्लिकेट आयडी, मेल आयडी, प्रोफाइल तयार करणे, वेबपेज चोरी करणे, दुसऱ्याच्या नावाने एसएमएस, फसविण्याच्या हेतूने ई-मेल पाठविणे यामध्ये तीन वर्षे शिक्षा आणि एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
कलम-66 : चोरून कुणाचे अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करणे व ते इंटरनेटवर टाकणे यामध्ये तीन वर्षे शिक्षा व एक लाखापर्यंत दंडाची तरतूद.
कलम- 67 बी : चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये पाच वर्षे शिक्षा आणि दहा लाखांपर्यंत दंड.
कलम 67 सी : सायबर कॅफे चालवणाऱ्याने इंटरनेट, संगणकाचा वापर करणाऱ्या प्रत्येक युजरचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक. जर रेकॉर्ड ठेवले नाही तर गुन्हा समजला जाईल. यासाठी तीन वर्षे शिक्षा, एक लाखापर्यंत दंडाची तरतूद.

नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल:
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार देशात 2010 ते 2014 दरम्यान सायबरचे 7 हजार 897 गुन्हे दाखल झाले. त्यात 6182 जणांना अटक झाली होती. क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार आयटी ऍक्ट आणि आयपीनुसार 2013 या वर्षात 3 हजार 281 गुन्हे दाखल झाले. त्यात 18 वर्षांपर्यंतचे 660, 18 ते 30 वर्षांपर्यंतचे 1833, 30 ते 45 वयोगटातील 657, 45 ते 60 वयोगटातील 122 आणि 60 वर्षांपुढील 9 आरोपींचा समावेश होता.

देशात 2013 मध्ये सर्वाधिक सायबरचे गुन्हे दाखल झालेले राज्य:

केरळ-312 , पश्चिम बंगाल-309, उत्तरप्रदेश-249, मध्यप्रदेश-197, हरियाणा-182, राजस्थान-154, महाराष्ट्र-561, आंध्रप्रदेश-454 ,कर्नाटक-437

 

कुठे व कशी कराल तक्रार?

१. जवळचे पोलीस स्टेशन

२. महिलांसंदर्भात कुठलीही तक्रार असल्यास मुंबई पोलिसांची हेल्पलाइन आहे – १०३

३. घरबसल्या केवळ एसएमएसद्वारे तक्रार करायची असेल तर ७७३८१३३१३३ आणि ७७३८१४४१४४ या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतो.

४. भारतात सध्या एकूण ५ ठिकाणी सायबर सेलची कार्यालये आहेत
पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलूरू, गुडगाव

पुणे: पोलीस सहआयुक्त पुणे,सायबर cell
Contact Details:
+91-20-2612 7277
+91-20-2616 5396
+91-20-2612 8105 (Fax)
Website:
http://punepolice.com/crime branch.html
E-Mail: [email protected]

मुंबई: पोलीस सहआयुक्त सायबर cell
Contact Details:
022 – 22653714
Web site: http://cybercellmumbai.gov.in/
E-mail: [email protected]

शिवाय प्रत्येक जिल्ह्यात एक सायबरसेल विभाग सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. सायबर गुन्हे होऊ नयेत म्हणून लोकांनी स्वतः पासूनच सुरुवात केली पाहिजे व कुणी मुद्दाम किंवा अनावधानाने असे गुन्हे करत असेल तर त्यांना असे करण्यापासून रोखले पाहिजे!
-गोपाळ  मदने
[email protected]
Twitter: @madanegopal
९९६०२७९३१०/७०२०५५४४८२