Home News Update दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरला, राष्ट्रवादीला धक्का?

दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरला, राष्ट्रवादीला धक्का?

Courtesy: Social Media
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे मंगलदास बांदल शिवसेनेकडून तिकिट लढवण्याची शक्यता आहे. मंगलदास बांदल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष आहेत. ते वळसे पाटील यांच्या विरोधात आंबेगाव मतदार संघातुन निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातुन मंजूर झालेल्या विकास कामांच्या उदघाटनाला मंगलदास बांदल यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी अनपेक्षितपणे हजेरी लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या उद्घाटन समारंभात माजी खासदार आढळराव पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.दिलीपराव वळसे पाटील यांच्या विरोधात मंगलदास बांदल उभा राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997