महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार – देवेंद्र फडवणीस

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार – देवेंद्र फडवणीस

भारतीय स्वातंत्र्याच्यात्त 72 व्या वर्धापनदिनानिमी मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमीत्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार या स्वतंत्र्यदिनी पुन्हा व्यक्त केला.
कोकणातुन समुद्रात वाहुन जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा – नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पुर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळामुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गेल्या तीन चार वर्षात कमी पावसामुळे काही भागात दुष्काळाचे संकट ओढावले आहे. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहूनजाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसेच वैनगंगा नदीचे तेलंगणाना जाणारे पाणी वैनगंगा – नऴगंगा योजनेत 480 कि.मी. चा बोगदा तयार करुन पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रतील दुष्काळी भागातील दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प आहे , असेही त्यांनी सांगितले. ए
      राज्यातील अतिवृष्टीमुळे उभ्दवलेल्या पूरपरिस्थितीतून तिन्ही सैन्यदले, एनडीआरएफ टएसडीआरएफ, तचरक्षक दल यांनी प्रचंड मेहनत करुन सुमारे 5 लाख नागरिकांची यशस्वी तुटका केली. पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी राज्यशासनाकडुन 6 हजार 800 कोटींचे पॅकेज तयार करण्यात आले असुन लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.