मुख्यमंत्री 5 वर्षं ‘या’ नेत्याची भाजपमध्ये येण्याची वाट पाहत होते, कोण आहे...

मुख्यमंत्री 5 वर्षं ‘या’ नेत्याची भाजपमध्ये येण्याची वाट पाहत होते, कोण आहे हा नेता?

आज कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तुती केली. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, माझ्यावर अन्याय झाला तो दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताकद दिली असं हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेशावेळी म्हटलं आहे.

तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी….

“गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हर्षवर्धन यांचा प्रवेश केव्हा होईल याकडे डोळे लावून बसलो होतो. त्यांचं भाजपमध्ये स्वागत करत आहे,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील याचं भाजपमध्ये स्वागत केलं.