गरीबीला कंटाळून दोन मुलींना विष पाजून मातेची आत्महत्या

गरीबीला कंटाळून दोन मुलींना विष पाजून मातेची आत्महत्या

● ७ महिन्यांची चिमुकली सुदैवाने वाचली
● जव्हार तालुक्यातील खरोंडा इथंली हृदयाला चटका लावणारी घटना

जव्हार- नव-यानं गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर पत्नी वृक्षला हिने स्वत:चा आणि चार लहान मुलींचा सांभाळ कसा करायचा या विवंचनेतून स्वतःसह दोन चिमुरड्या मुलींना विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात वृक्षला सह तीन वर्षांच्या दीपालीचा मृत्यु झाला तर ७ महिन्यांची वृषाली सुदैवान वाचलीय. घटना घडली तेव्हा सुमिता (९ वर्षे) आणि जागृती (७ वर्षे) या शाळेत गेलेल्या होत्या, त्यामुळं त्या वाचल्या. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र गहिवरून गेला होता.

लक्ष्मी अमृत टोकरे (मृत वृक्षलाची आई) हिने दिलेल्या फिर्यादी वरुन ५ जुन रोजी वृक्षला (वय ३०) हिने स्वतःसह विष पिऊन दोन्ही मुलींनाही पाजून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये मोठी मुलगी दिपालीचा आणि वृक्षलाची मृत्यु झाला तर ७ महिन्यांची वृषाली बजावलीय.

मूळात जुन महिन्यात हडवा कुटुंबाचा प्रमुख असलेल्या वृक्षलाचा नवरा जीवन यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर जगायचं कसं, हाताला रोजगार नाही, या विवंचनेतून हडवा कुटुंबातील उर्वरित सदस्यांनीही आत्महत्या केल्याची नोंद जव्हार पोलिस ठाण्यात करण्यात आलीय.

रोजगार हमी योजना, घरकुल योजना, रेशनिंगवर धान्य, विधवांना आर्थिक मदत अशा अनेक सरकारी योजना आदिवासींसाठी शासन राबवतंय. मात्र, या योजना किती पोकळ आहेत त्या कागदावरच कशा राहतात हे या घटनेवरुन समोर आलंय.

अत्यंत गरीब प्रतिकूल परिस्थिती हे कुटुंब जीवन जीवनाचा गाडा चालवत होते. मात्र, या गरीब व दारिद्रयाला कंटाळून नव-याने आत्महत्या केल्याने पत्नीनं संपूर्ण कुटुंबच संपण्याचा निर्णय घेतला. नव-याचे निधन झाल्यानंतर वृक्षलाकडे उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नव्हतं. ‘’मुलींना रोज दोन घास मी कुठून आणू’’ या विवंचनेत ती असल्याचं वृक्षलाच्या शेजा-यांनी सांगितलं.