Home News Update मोठी बातमी : नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड

मोठी बातमी : नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड

Courtsy : Social Media
महाविकास आघाडीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेला आणखी एक निर्णय रद्द आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत रद्द केला. फडणवीस सरकारने 2016 ला नगराध्यक्ष आणि सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला होता.
आज झालेल्या मंत्रीमंडल बैठकीत नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येईल. या संदर्भात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येते. या बैठकीत अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याची राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधि व न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसूदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997