राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी राजीनामा देऊन आज शिवसेनेत प्रवेश केला. आमदार पांडुरंग बरोरा यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते. पांडुरंग बरोरा यांनी काल विधासभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. आज त्यांनी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पुढील होणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादीला शहापूरमध्ये मोठा धक्का बसणार आहे. शिवसेनेने केलेल्या कार्याला प्रभावित होऊन शहापूरमधील कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आलो आहे असं पांडुरंग बरोरा यावेळी बोलले . अधिक काळ राष्ट्रवादीत काम करत असताना २० वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मिळाला , त्याचबरोबर अनेकवेळा शिवसेनेचे आमदार आणि नेते माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला असं त्यांनी सांगितले.