Home News Update महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकतं माप ! कोणत्या पक्षाकडं असणार कोणतं खातं?

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकतं माप ! कोणत्या पक्षाकडं असणार कोणतं खातं?

courtesy- Social media
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येऊन देखील अजुनही कोणत्याही मंत्र्याला खाते वाटप झालेलं नाही. त्यामुळं महाआघाडीच्या सत्तेचं गुऱ्हाळ अजुपर्यंत काही थांबलेलं नाही.
मात्र, मॅक्समहाराष्ट्रला विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडं गृह, अर्थ, गृहनिर्माण ही महत्वाची खाती दिली जाणार आहेत. तर काँग्रेस स्वत: कडे महसूल ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. कॉंग्रेसकडं उद्योग, उर्जा, वस्त्रोद्योग ही खातीही देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेकडे नगर विकास आणि सामान्य प्रशासन ही खाती देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी – गृह, अर्थ, गृहनिर्माण
काँग्रेस – महसूल , उद्योग, उर्जा, वस्त्रोद्योग, पशु वैद्यकीय
शिवसेना – नगर विकास, सामान्य प्रशासन, कृषी ग्रामविकास
पक्षाच्या आमदारांच्या सुत्रांप्रमाणे प्रत्येक पक्षाला मंत्रीपद मिळतील असं गणित ठरलं असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे ५४ आमदार आणि कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत.
मॅक्समहाराष्ट्र च्या हाती आलेल्या माहिती नुसार राष्ट्रवादीने आपल्या पदरात जवळ जवळ सर्व महत्वाची खाती पाडून घेतली असल्याचं चित्र आहे. एकंदरीत सत्तास्थापनेच्या भूमिकेत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस ने आपल्या पदरात महत्वाची मंत्रीपद पाडून घेतली असल्याचं चित्र आहे. यावरुन महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा आपल्याला पाहायला मिळणार असं एकंदरीत चित्र आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997