जुन्या पेन्शनचा लढा अपयशी?

जुन्या पेन्शनचा लढा अपयशी?

विविध निवेदनं, मोर्चे, आंदोलनं करून ही सरकार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आता, राज्य शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, महसूल सह जिल्हा परिषद व महापालिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज एकदिवसीय संप पुकारला. आज या संपात राज्यातील प्रमुख 35 हुन अधिक संघटनांनी भाग घेतला आहे.

2005 पासून लागू केलेली अंशदायी (DCPS) पेंशन योजना ही कुटूंब व्यवस्था उध्वस्त करणारी फसवी योजना आहे. सेवेत असताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कोणताही आधार सरकार देत नाही. अशा अनेक कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही नवी योजना रद्द करण्यासाठी गेली चौदा(१४)वर्षे राज्यातील 2005 नंतर नियुक्त सर्व विभातील कर्मचारी व संघटना प्राणपणाने कोर्टासह रस्त्यावर ही लढत लढत आहे.

‘समान काम समान वेतन’ या तत्वाचा विचार करून “जुनी पेंशन योजना सरसकट लागु करावी” ही प्रमुख मागणी या सर्व संघटनांनी केली आली आहे. या संदर्भात जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ते जगदीश ओहोळ यांच्यासह शिक्षकांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचित करताना सरकार शिक्षकांवर कशा प्रकारे अन्याय करत असल्याचं सांगितलं.