Home Election 2019 पुण्यातील ८ मतदार संघात कशा होणार लढती…?

पुण्यातील ८ मतदार संघात कशा होणार लढती…?

117
0

पुण्यातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे कोथरूड. कोथरूड मतदार संघात सध्या भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उभे असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभेच्या मतदार संघाकडे लागलं आहे.या मतदारसंघात मनसे, भाजप, आम आदमी पक्ष यांच्यात प्रमुख लढत आहे.

कसबा मतदारसंघात भाजप, शिवसेना बंडखोर, मनसे आणि काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. पर्वती मतदारसंघातून भाजप, राष्ट्रवादी यांच्यात लढत आहे. खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी,  भाजप यांच्यात सामना रंगणार आहे. हडपसर मधून भाजप, मनसे, राष्ट्रवादी हे पक्ष आमने-सामने आहेत. वडगाव शेरी मधून आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी, भाजप तर कॅन्टोमेंट मधून भाजप, एम आय एम, काँग्रेस आणि शिवाजीनगर मधून काँग्रेस, भाजपचे उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत.

यापैकी कुणाचं नाणं चालणार हे २१ तारखेला होणाऱ्या मतदानातून समोर येईल. या आठही मतदार संघातील घडामोडींविषयी पत्रकार शैलेश काळे यांच सविस्तर विश्लेषण…

Support MaxMaharashtra

 

 


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997