Home Election 2019 मी दिल्लीला आहे, महाराष्ट्रात येण्याचा प्रश्न नाही – नितीन गडकरी

मी दिल्लीला आहे, महाराष्ट्रात येण्याचा प्रश्न नाही – नितीन गडकरी

courtesy social media
Support MaxMaharashtra

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. येणारे दोन दिवस महाराष्ट्रातील सत्तेसाठी महत्व्याचे असणार आहेत. या सगळ्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एंट्री झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्या भेटीनंतर नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. अशामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) राज्यात परतणार असल्याची चर्चा होती. मात्र,गडकरी यांनी आज याला पूर्णविराम दिला आहे.

त्यांनी आज माध्यमांसमोर बोलताना म्हटले आहे की भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळालं आहे, त्यामुळे यावरती मार्ग निघेल ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री या न्यायाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. महाराष्ट्रात भाजपचे १०५ जागा आहेत त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल. त्याचबरोबर मोहन भागवत आणि संघाचा याच्याशी संबंध जोडणं बरोबर नाही असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997