Home Election 2019 ‘मला आमदार का व्हायचंय’ पांडूरंग फुंडकर यांच्या निधनानंतर खामगाव मतदारसंघात काय आहे भाजपची स्थिती?

पांडूरंग फुंडकर यांच्या निधनानंतर खामगाव मतदारसंघात काय आहे भाजपची स्थिती?

1378
0

मला आमदार का व्हायचंय ? या मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेष कार्य़क्रमात दिवंगत नेते पाडूरंग फुंडकर यांचे चिरंजीव अँड आकाश फुंडकर यांच्याशी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पांडूरंग फुंडकर यांच्या निधनानंतर खामगाव मतदारसंघात सध्या पक्षाची स्थिती काय आहे? आकाश यांच्या नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना कोणत्या आणि विधानसभेच्या दृष्टीकोनातून त्यांची काय आहे राजकीय रणनिती? या संदर्भात आमचे प्रतिनिधी निखिल शाह यांनी केलेली बातचित

 निवडणूक लढविण्याचा अजेंडा काय असेल?

 आमचा अजेंडा हा विकासाचा अजेंडा आहे खामगाव हा विशेषत: ग्रामीण मतदार संघ अवर्षण ग्रस्त तालुका आणि यामध्ये मूलभूत गरजा आजपर्यंत लोकांच्या गेल्या पंधरा वर्षात पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जातोय. गेल्या पाच वर्षात 23 कोटी रुपयांची ग्रामीण भागात आजपर्यंत आम्ही कामं केली. तसंच शहरांमध्ये सव्वाशे कोटी रुपयांचे काम केलं. असंच सर्व विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत.

Support MaxMaharashtra

 असा कुठला प्रोजेक्ट आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आणला आहे?

 महत्वाकांक्षी प्रकल्प निम्न ज्ञान गंगा गेल्या दोन वर्षांपूर्वीच आम्ही त्याची सुप्रमा शासनाकडून घेतली आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण करून परिसरातील शेतकऱ्यांची 4000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे. आम्हाला आनंद आहे की, आम्ही सुप्रमा आणल्यानंतर प्रकल्प पूर्ण करून आज तो शंभर टक्के भरला आहे.

ग्रामीण भागामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षा नंतरही रस्ते नाहीत.. आपल्या मतदारसंघाची काय स्थिती काय आहे?

 आज माझ्या मतदारसंघात एकही गाव बिन रस्त्याचं राहिलेलं नाही. मध्यंतरी दोन वस्त्या रस्त्याचा प्रश्न आला होता. आम्ही तात्काळ मंजूर केले होते. स्थानिक नागरिकांनी दानपत्र न दिल्यामुळे हे रस्ते रखडलेले आहेत. मात्र, 99.99% मतदारसंघातील जवळजवळ रस्त्यांची कामं पूर्ण केली आहेत. खामगाव ला येणारा प्रत्येक हायवे हा आम्ही कॉंक्रिटीकरण करून मजबूत केला आहे. त्यामध्ये चार पदरी असतील तीन पद्री असतील अशा रस्ते बनविण्याचं काम खामगाव मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

शहरात व ग्रामीण भागात आपली प्रचाराची रणधुमाळी कशा पद्धतीने सुरू आहे?

 आम्ही रोज सकाळी आठ वाजता प्रचार बांधत असतो. रोज एक जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. गाव भरपूर आहेत. वेळ कमी आहे. डोअर टू डोअर जाऊन प्रचार आपण करतो.

आपली लढत कोणासोबत असेल?

माझी लढत खरंतर पाहिलं तर त्यांच्याशी होती ते मतदारसंघांमधून पळून गेले आहेत. मतदारसंघांमध्ये बाहेरून उमेदवार आणून या ठिकाणी काँग्रेसने उभे केले आहेत. काँग्रेस पक्षाला नैतिक अधिकार नाही. खामगाव मतदारसंघांमध्ये तरुण कार्यकर्ते असतानासुद्धा बाहेरील उमेदवार आयात केला. त्यामुळे त्यांचा स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे माझी लढत माझ्याशीच असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मतदार संघाच्या शाश्वत आणि संभ्रम विकासासाठी आपण कटिबद्ध असणार असे त्यांनी यावेळी ‘मॅक्समहाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997