Home Governance मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महादेव जानकरांकडून मत्स्योद्योग महामंडळाचा १० लाखांचा धनादेश

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महादेव जानकरांकडून मत्स्योद्योग महामंडळाचा १० लाखांचा धनादेश

महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या वतीने पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  दहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज वर्षा या शासकीय निवासस्थानी सुपुर्द केला.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने आतापर्यंत हजारो लोक बाधित झाले आहेत. त्यामुळे आता सर्वच स्तरातून येथील नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. प्रत्येक जण आपआपल्या परिने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशीच मदत मत्स्योद्योग महामंडळाच्या वतीने जानकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत ही रक्कम पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997