स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : शिवसेनेचे दानवे विजयी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : शिवसेनेचे दानवे विजयी

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे अंबादास दानवे हे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ६५७ पैकी ५२४ मतं मिळाली. त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या बाबुराब कुलकर्णी यांना केवळ १०६ मतं मिळाली. अपक्ष सहनावाज खान यांना 3 मतं, तर 13 मते बाद झाली.

१९ ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत दानवे विजयी झाले. काँग्रेसमधून बाहेर पडलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह एमआयएमच्या मतदारांनीही दानवेंच्या पारड्यात मतदान केल्याच्या चर्चा आहेत.

अंबादास दानवे हे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेत पाठवण्यासाठी थेट मातोश्रीवरून हालचाली झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव होणं आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दानवे यांचा विजय होणं ही औरंगाबाद शिवसेनेतल्या नव्या समिकरणांची सुरुवात म्हणावी लागेल.