जवान निवडणुकीला उभे आहेत का? – राज ठाकरेंचा मोदींना सवाल

जवान निवडणुकीला उभे आहेत का? – राज ठाकरेंचा मोदींना सवाल

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेड येथे सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर खास ठाकरे शैलीत टीका केली. विशेष 2019 च्या लोकसभा निवडणूकीत राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकही उमेदवार उभा केलेला नाही. तरीही राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत आहेत.
यावेळी राज यांनी मोदींवर टीका करताना पुलवामा हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय ‘मोदी जाईन तिथे सभा घेतात, पण कधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांबाबत, तरुणांबाबत बोलले का?, असा सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला आहे.