Home News Update वनखात्याच्या हातावर तुरी देऊन बिबट्या पसार

वनखात्याच्या हातावर तुरी देऊन बिबट्या पसार

Support MaxMaharashtra

खेड तालुक्यातील कोयाळी येथील बाबदेव वस्तीमध्ये पहाटे साधारण एक वर्षे वयाचा बिबट्या घुसला होता. या घटनेची माहिती माहिती कळताच बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची संपूर्ण यंत्रणा हजर झाली बिबट्याला जेरबंद करतानाचे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी ही जमली होती.

या गोंधळामुळे वनविभागाला काम करताना अडचण येत होती. बिबट्याला जेसीबीच्या साहाय्याने झाडावरून खाली उतरवलं जात होतं. जेसीबीच्या साहाय्याने बिबट्याला खाली उतरवलं देखील. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीला छिद्र असल्यानं वन विभागाच्या हातात आलेला बिबट्या पळाला.

जर हा बिबट्या मोठा असता तर त्याने मनुष्यावर देखील हल्ला केला असता. त्यामुळे वन विभागाकडं बिबट्या अथवा बिबट्या साऱखे वन प्राणी पकडण्याची साधनसामुग्री व्यवस्थित नाही का? यामुळे वनविभागाचा कारभारच चव्हाट्यावर आला आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997