एवढं शिकूनही जातीयवाद काही थांबेना

एवढं शिकूनही जातीयवाद काही थांबेना

एवढं शिकूनही जातीयवाद काही थांबेना
मुंबई येथील नायर रूग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरांच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली होती. छळ करणाऱ्या तीनही महिला डॉक्टर अचानक गायब झालेल्या आहेत. डॉ. पायल यांना आदिवासी असल्यानंही मानसिक त्रास देण्यात आला होता. याविषयी तक्रार करून ही वरिष्ठांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. मुंबईतल्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यास क्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल यांना डॉक्टर हेमा, भक्ती आणि अंकिता सातत्याने मानसिक त्रास देत होत्या, तशा तक्रारी वेळोवेळी महाविद्यालय आणि रूग्णालयातील वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, वरिष्ठांनी वेळीच कारवाई केली नाही, असा आरोप डॉ. तडवी यांच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आता शासनाने समिती तयार केली आहे. ही समिती कायद्यात सुधारणा करून आणखी कठोर करण्यासाठी सूचना करणार आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहे.
वैद्यकीय सारखं उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील असा जातीयवाद हा गंभीर आहे, अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज असण्याची मागणी पुढे येत आहे.