Home News Update ‘भटा बामनांचा पक्ष’ वाड्यावस्त्यावर कोणी पोहोचवला? : प्रा लक्ष्मण हाके

‘भटा बामनांचा पक्ष’ वाड्यावस्त्यावर कोणी पोहोचवला? : प्रा लक्ष्मण हाके

Maharashtra, bjp, politics, news, marathi, blog, Laxman Hake
Support MaxMaharashtra

सुरुवातीला भाजपबाबत ‘भटा बामनांचा पक्ष’ आहे. असं म्हटलं जायचं. मात्र, नंतर हाच पक्ष महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावर जाऊन पोहोचला. मात्र, वाडावस्त्यावर हा पक्ष घेऊन जायचं काम कोणी केलं? अर्थात ओबीसी नेत्यांनीच. ज्या ओबीसी नेत्यांनी हे काम केलं, त्यांच्या वाट्याला मात्र, महाराष्ट्रात पुरेसे प्रतिनिधित्व मिळालं नाही. असं खेदानं म्हणाव लागतं.

वसंतराव भगवंत चा ” माधव ” पॅटर्न ना स फरांदे, अण्णा डांगे, गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी महाराष्ट्रात ‘माधव’ फॉम्युर्ल्याचा वापर करत महाराष्ट्रात भाजप वाढवली. त्याच ओबीसीचं नेतृत्व संपवण्याचा डाव भाजप ने खेळला आहे.

पंकजा मुंडे, नाथाभाऊ खडसे, महादेव जानकर ही त्याची काही उदाहरण आहेत. सध्या या सर्व नेत्यांना अडगळीत टाकण्याचं काम भाजपनं केल्याचं दिसतं. काहींचं तिकिट कापून घरी बसवलं. तर काहींचा निवडणूकीत पराभव करुन घरी बसवलं.

जर सध्या भाजपाच्या नियुक्त १०५ आमदारापैकी ओबीसी समाजाचे किती आमदार आहेत हा संशोधनाचा विषय आहे.

हे ही वाचा…

ऊस लागवड़ीची एक डोळा पद्धत शेतकऱ्यांच्या फ़ायद्याची की तोट्याची?

पुराने उद्ध्वस्त झालेल्या शाळा कधी दुरुस्त होणार?

कांदा महागला, अर्थमंत्री म्हणतात मी जास्त कांदा खात नाही

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची माणसं राजकारणात आणण्यासाठी काही ओबीसी नेतृत्वाचा बळी दिला.

1) मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातून उमेदवारी देत रमेश अप्पा कराड यांचा बळी दिला का ?

2) नाशिक येथून आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट का कापले?

3) पाथरी येथून आमदार मोहन फड यांना आरपीआय च्या तिकीटावर लढायला भाग का पाडले?

4) गंगाखेड ची हक्काची राष्ट्रीय समाज पक्षाची हक्काची जागा का सोडून दिली?

४) सिंखेडराजा मतदारसंघात तोताराम कायंदे यांना सतत का डावलले ?

५) कर्जत जामखेड मध्ये भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या विरोधात कोणत्या नेत्याने काम केले?

६)सहयोगी मित्र पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाला एक ही जागा न देता भाजप ने अचानक दगा कशामुळे दिला?

७) गोपीचंद पडळकर हे जत मतदारसंघातून निवडून येणार अशी शाश्वती असताना, त्यांना बारामती मध्ये कुणामुळे पाठवले?

८) हडपसर मध्ये भाजप उमेदवार योगेश टिळेकर यांच्या विरोधात भाजप मधील एक गट विरोधात असताना कारवाई का नाही??

माळी धनगर वंजारी(माधव) या समुहांच्या मतांवर मोठा झालेला भाजप, हा पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्य़ांवर अन्याय का करत आहे. भाजपला आता ओबीसी नेत्यांची गरज नाही का?

अशीच परिस्थिती राहिली तर कायम राहीली तर भाजपला ओबीसी समाज आरसा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997