Home > लयभारी ग्रुप > कोण आहेत 'हे' डांसर अंकल ? 

कोण आहेत 'हे' डांसर अंकल ? 

कोण आहेत हे डांसर अंकल ? 
X

दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ वायरल होताना दिसतोय. सुटाबुटातील एक काका "आप के आ जाने से" या गाण्यावर उत्तम डान्स करताना दिसत आहेत. या काकांनी त्यांच्या ठुमक्यांवर अनेकांची मने जिंकली. जरा हा व्हिडीओ पहा.

या व्हिडीओ ची नशा संपते न संपते तोच त्यांचा दुसरा व्हिडीओ आला आहे. यात हे काका "चढती जवानी मेरी चाल मस्तानी तूने कदर न जानी रामा" या गाण्यावर थिरकताना दिसतात.

आता जरा काकांची ओळख करून घेऊया.

नाव- संजीव श्रीवास्तव

पेशा- प्राध्यापक भोपाळ भाभा युनीव्हर्सीटी

ठिकाण- विदिशा

[video width="848" height="480" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2018/06/WhatsApp-Video-2018-05-31-at-8.53.36-PM.mp4"][/video]

या दुसऱ्या व्हिडीओ वरून आता तुम्हाला त्यांच्या स्टाईलचा अंदाज आलाच असेल.

संजीव श्रीवास्तव यांची पत्नी म्हणजेच जी गाण्यामध्ये त्यांच्या सोबत डान्स करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. त्यांचं नाव अंजली श्रीवास्तव. यातील आश्चर्याची बाब म्हणजे एव्हढा चांगला डान्स टीचर घरी असून देखील त्या एकही स्टेप शिकू शकलेल्या नाहीत.

काकांचा हा ढासू डांस या गोष्टीची निशाणी आहे कि बालपण आणि तारुण्य तो पर्यंत संपत नाही. जो पर्यंत तुम्ही त्याला दाताने पकडून ठेवता आणि संपूर्ण आत्मविश्वासाने लोकांना सांगता कि बघा माझ्या तारुण्याचा रिचार्ज अजून संपलेला नाही. पिच्चर अजून बाकी आहे

Updated : 1 Jun 2018 12:14 PM GMT
Next Story
Share it
Top