भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले…

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले…

121
0

“पुराने घराची अवस्था होत्याची नव्हती झालीय, बायको मुलं तेवढी वाचली. मी शेतमजूर आहे घर कसं बांधू”

अशी व्यथा दिग्रज गावाच्या कांबळे यांनी मांडलीय. शेतीच्या शेती पाण्याखाली गेली. अजून दोन महिने तरी कोणी पीक लावण्याची शक्यता नाही. मग अशा वेळी शेतमजूराच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार हा जीवघेणा प्रश्न निर्माण झालाय. असे लाखो शेतमजूर देवाचा नाही तर सरकारचा धावा करत आहेत. सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी आशा त्यांना आहे.