कोल्हापूर गंभीर तर सातारकर खंबीर…!

कोल्हापूर गंभीर तर सातारकर खंबीर…!

सध्या सांगली, कराड, कोल्हापूरमध्ये उध्दभवलेल्या महापुरासारख्या नैसर्गिक संकटामध्ये त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून साताऱ्याच्या शाहूपुरीतील तरुण पुढे सरसावले आहेत. यंग इन्स्पीरेशन चॅरिटेबल सोसायटी, कट्टा ग्रुपची हि तरुण मंडळी पूर्ण ताकदीनिशी मदतकार्य राबवत आहेत आणि सोबतच इतर सातारकरांनाही मदतीसाठी प्रोत्साहित करून कोल्हापूर व सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी जीवनोपयोगी वस्तू जमा करून पाठवत आहेत. या पुरातल्या हिरोंच्या वतीने, कोल्हापूर गंभीर तर सातारकर खंबीर…! अशा अनोख्या पद्धतीने अधिकाधिक सातारकरांना मदतीचे आव्हान केले जात आहे.