Home News Update पुणे विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना RSS चे धडे

पुणे विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना RSS चे धडे

savitribai-fule-university-pune_
Courtesy :Social Media
Support MaxMaharashtra

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन विद्या विभागाच्या रानडे इन्स्टिट्यूटने पत्रकारीता विभागातील पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या “Knowing RSS” या उपक्रमाला उपस्थित राहावे. अशी नोटीस बजावली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व संवाद केंद्राच्या विनंतीवरुन ही नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस पत्रकारीता विभागाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आरएसएस चे संपर्क प्रमुख अनिरुद्ध देंशपांडे हे आहेत.

पुणे विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना RSS चे धडे

पुणे विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना RSS चे धडे #MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 13 फ़रवरी 2020

या संदर्भात आम्ही विभागाचे विभाग प्रमुख सं. वी. तांबट यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारची कुठलीही नोटीस दिली नसल्याचं सांगितलं. मात्र, विभागाच्या नोटीस बोर्डवर या कार्यक्रमाची नोटीस लावण्यात आली होती. तसंच पत्रकारीता विभागातील विद्यार्थ्यांच्या चौथ्या सेमीस्टर मध्ये 6 व्या आठवड्याच्या 15 फेब्रुवारीच्या वेळापत्रकात (Known RSS In Present Context ) या विषयाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळं पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमात आरएसएस चा अभ्यासक्रम कशासाठी? नक्की कशासाठी असा सवाल उपस्थित होतो.

त्यामुळं आम्ही या संदर्भात विभाग प्रमुख यांच्याशी केली असता, त्यांनी ‘चौथ्या सेमिस्टर मध्ये Political Party & Ideology हा विषय आहे. या विषयाअंतर्गत राजकीय पक्षांची विचारधारा समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, असं त्यांनी सांगितलं. तसंच आम्ही इतरही कार्यक्रमाला जाण्यासाठी मुलांना सांगतो. मागच्या आठवड्यातच स्तंभ लेखक प्रताप भानू मेहता यांच्या कार्यक्रमाला आमची विद्यार्थी गेले होते. आमचे विद्यार्थी इतरही चर्चा सत्रात सहभागी होतात. असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

मात्र, राजकीय पक्षाची विचारधारा समजून घेण्यासाठी आरएसएसच्या संपर्क प्रमुखाची गरज आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
या संदर्भात स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांच्याशी देखील बातचित केली असता, त्यांनी जातीय धार्मीक ध्रुवीकरण निर्माण करणारी आरएसएस संस्था पत्रकारीतेच्या अभ्सासक्रमात विदयार्थ्यांना काय धडे देणार? असा सवाल कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित करत विदयापीठाला या गोष्टी अभ्यासक्रमात घेणे जर महत्वपुर्ण वाटत असेल तर मार्क्सवादी, आंबेडकरवादी, समाजावादी विचारांचा देखील समावेश असणं गरजेचं असल्याचं मत कुलदीप आंबेकर यांनी व्यक्त केलं आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997