सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात कोथरूड मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. कोथरूड मतदारसंघातून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी आणि यांच्या समर्थकांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळत होता.
चंद्रकांत दादा मूळचे कोल्हापूरचे असल्यानं आणि हा मतदारसंघ ब्राम्हण बहूल मतदारसंघ असल्यानं ब्राह्मण महासंघाकडून तसंच इतर संघटनांकडून त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध होत असल्याचं पाहायला मिळालं.
या मतदारसंघातून मनसेचे उमेदवार किशोर शिंदे हे निवडणूकीच्या मैदानात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला या ठिकाणी सक्षम उमेदवार न भेटल्याने त्यांनी किशोर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.
किशोर शिंदे यांचा मतदार संघात असलेला प्रभाव आणि त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मिळालेला सपोर्ट या सर्व कारणांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर किशोर शिंदे यांनी मोठं आव्हान निर्माण केलं आहे. या संदर्भात किशोर पाटील यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी बातचित केली पाहा काय म्हणाले किशोर शिंदे…
Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997