आर्मी मा बायासले सारखी संधी द्या, मोदी सरकारले कोर्टना दणका 

Indian Army women
Courtesy : Social Media

सुप्रीम कोर्टनी सोमवारले मोदी सरकारले मोठा दनका दिना. आर्मी मा बायासले कायम नोकरी देवाले पाहिजे अन त्यासले मोठं पद बी देवाले पाहिजे असं सांगत कोर्टने मोदी सरकारले चांगलंच फटकारेल शे. याना पह्यले हायकोर्टनी बायासले आर्मी म्हा सारखी संधी द्यायले पाहिजे असे आदेश देल व्हते. पण याना विरोधमा मोदी सरकारनी सुप्रीम कोर्टमा याचिका करेल व्हती. यानावर सोमवारले कोर्टमा सुनावणी व्हयनी, त्यामा कोर्टनी सरकारले फटकारत सांगं की आते सरकारनंभी त्यासनं डोकं बदलाले पाह्यजे.