बंडखोर शिवसैनिकाची कमाल; भाजपला पकडलं कोंडीत

बंडखोर शिवसैनिकाची कमाल; भाजपला पकडलं कोंडीत

Courtesy : Social Media

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भाजप शिवसेनेची युती झाली असली तरी दोन्हीही पक्षातील बंडखोरीनं चांगलाच जोर धरला आहे. कल्याण पूर्व मतदार संघातही असाच प्रकार घडलाय.

शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराविरोधात खुद्द शिवसेनेच्याचं नेत्यानं दंड थोपटले असून आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यावरच न थांबता भाजप नगरसेवकांचाही पाठींबा मिळवला आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघात युतीने भाजपचे गणपत गायकवाड यांना आपली उमेदवारी घोषित केली. यावर शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी पसरली आहे.

शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून भाजपचे दोन नगरसेवक आणि बीएसपीचा एक नगरसेवक यांचाही शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांना पाठींबा मिळाला आहे. एकूणच भाजप-सेना युतीचे उमेदवार गणपत गायकवाड चांगलेच अडचणीत आले अडचणी आले आहेत.

Live -कल्याण पूर्व मतदार संघात शिवसेनेने भाजप उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटले. शिवसेनेच्या सर्व नगरसेवक-पदाधिकारी यांचे राजीनामे. भाजपचे दोन नगरसेवक आणि बीएसपीचा एक नगरसेवक यांचा शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांना पाठींबा. भाजप-सेना युतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 9 अक्तूबर 2019