न्यायपालिकेला आत्मचिंतन करण्याची गरज आहे – कॉंग्रेस

न्यायपालिकेला आत्मचिंतन करण्याची गरज आहे – कॉंग्रेस

देशाचं सर्वोच्च न्यायालय एका स्वल्पविराम किंवा तांत्रिक कारणांवरून स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार नाकारत असेल तर ही गंभीर परिस्थिती आहे. या देशाच्या सर्वोच्च न्यायलयाने या आधी कागदांशिवाय सुनावणी केल्या आहेत. वर्तमानपत्रातील बातम्यांवर सु-मोटो केसेस सुनावणीसाठी घेतल्या आहेत. अशा न्यायपालिका जेव्हा एका रजिस्टार किंवा तांत्रिक बाबींवर सुनावणी टाळतात तेव्हा न्यायपालिकेलाही आत्मचिंतनाची गरज आहे असं वाटतं, असं मत काँग्रेसने व्यक्त केलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी भारतीय जनता पक्षा तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरे, अखिलेश यादव, मायावती तसंच इतर विरोधी पक्षातील नेत्यांची एक मोठी लिस्ट आहे, ज्यांना धमकवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे, ज्यांनी भाजपाचं सदस्यत्व घेतलं त्यांना मात्र तपास यंत्रणांनी क्लीन चीट दिल्या आहेत. मुकूल रॉय, नारायण राणे यांच्यासारखी मोठी यादी आहे, ज्यांना भाजपामध्ये प्रवेश केल्यावर अभय मिळालं आहे.