ABP न्यूज भेदभाव करतं का?

ABP न्यूज भेदभाव करतं का?

प्रियांका गांधी यांच्या सोनभद्र येतील पिडीत परिवारांच्या भेटीसाठी आयोजित दौऱ्याच्या वेळी आर्टीकल 370 वर बोला म्हणून एबीपी न्यूज च्या प्रतिनिधीने त्यांच्यासमोर बूम धरला. या वेळी प्रियांका गांधी यांनी मला इथल्या पिडीतांशी बोलायचंय असं सांगीतलं आणि प्रियांका गांधी यांच्या समर्थकाने एबीपी च्या रिपोर्टर ला बाजूला ढकलत ठोक दूंगा अशी धमकी दिली. या घटनेचा हा व्हिडीयो

या घटनेचा हा व्हिडीयो पंकज झा यांनी सोशल मिडीयावर प्रसारित केला. पंकज झा हे तेच प्रतिनिधी आहेत ज्यांचा एक व्हिडीयो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान व्हायरल झाला होता. गोरखपूर इथल्या अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगाल बद्दल पंकज झा यांनी प्रश्न विचारला होता आणि अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्याला हाक मारून झा यांना बाजूल काढलं होतं.

हे दोन व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल आहेत. एबीपी नेत्या-नेत्यांमध्ये भेदभाव करतं का असा प्रश्न ही सोशल मिडीया वर विचारला जात आहे.