INX Media Case : चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

INX Media Case : चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

Chidambaram-INX Media case LIVE updates: Not been accused of any offence in INX Media case, says ex-FM at media briefing

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना रात्री INX Media प्रकरणात अटक केल्यानंतर आज राउज एवेन्यू येथील सीबीआय च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आज कोर्टाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नक्की काय झालं न्यायालयात…

चिदंबरम यांच्या बाजूनं न्यायालयात ज्येष्ठ वकील कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी तर सीबीआयच्या बाजूनं तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी चिदंबरम यांच्या 5 दिवसाची रिमांडची मागणी केली, चिदंबरम यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप

कार्ती चिदंबरम आणि भास्कर रमन यांच्या जामीनाला सीबीआयने कधीही चॅलेंज केले नाही – कपील सिब्बल

आम्हाला माहिती आहे. सीबीआयने ताब्यात घेतल्यावर ते काय करतील? त्यांनी रात्रभर चिदंबरम यांना झोपू दिलं नाही. सकाळी 8 वाजता देखील ते प्रश्न विचारु शकत होते. मात्र, त्यांनी 11 वाजता प्रश्न विचारायला सुरुवात केली. 12 प्रश्न विचारले गेले. 6 प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. न्यायालयानं सीबीआयला विचारायला हवं कोणते प्रश्न विचारले गेले – कपील सिब्बल

सीबीआयचे हे पूर्ण प्रकरण इंद्राणी मुखर्जीच्या पुराव्यावर आणि केस डायरीवर अवलंबून आहे, चिदंबरम यांना एका अप्रूवरच्या स्टेटमेन्टवर अटक करण्यात आली आहे. अप्रूवरची साक्ष स्टेटस असते, पुरावा नाही – अभिषेक मनू सिंघवी

निर्णय घेणाऱ्याला दोषी ठरवलं गेलंय… अभिषेक मनू सिंघवी

सीबीआयचं या सर्व प्रकरणात वर्तन चुकीचं आहे. सीबीआय इतकी त्रस्त का आहे.? सीबीआय म्हणते रिमांड द्या, मात्र, आरोप काय आहेत? हे सांगितले नाही. या केसमध्ये इतर कोणालाही अटक झालेली नाही. FIPB च्या या प्रकरणातील 6 आरोपींना अद्यापर्यंत ताब्यात घेतलेलं नाही. ज्यांनी या प्रकरणाला मंजूरी दिली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.

सीबीआयचे अर्धे प्रश्न जुनेच – अभिषेक मनू सिंघवी

 या प्रकरणात 12 प्रश्नांपैकी 6 प्रश्न जुने आहेत. या प्रकरणात चिदंबरम यांना देखील आपली बाजू मांडण्याची परवानगी द्यायला हवी…

त्यानंतर चिदंबरम यांना न्यायाधीशांनी आपलेकडे बोलण्यासाठी काही आहे का? असा प्रश्न केला. मात्र, यानंतर लगेच सीबीआयचे वकील SG तुषार मेहता यांनी आरोपीला दोन वकील असताना बोलण्याची परवानगी देऊ नये म्हणून हरकत घेतली.

चिदंबरम यांचा दोन वेळा न्यायालयात बोलण्याचा प्रयत्न सीबीआयचा विरोध

सीबीआयच्या बाजूनं हे सांगण्यात आलं की, ही चुकीची परंपरा आहे. यांच्या बाजूनं दोन वकील बाजू मांडत आहेत. ज्याचा आम्ही विरोध केला नाही.

काय बोलले चिदंबरम…

‘सीबीआय ने मला विचारले आपले विदेशात एखादं खातं आहे का? मी सांगितलं माझ्या मुलाचं परदेशात खातं आहे. माझं कोणतंही बाहेर खातं नाही. मी 6 जून 2018 ला सीबीआयच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मी कोणतेही पैसे घेतलेलं नाहीत.’

हा खटला पुराव्याच्या छेडछाडीचा नाही… अभिषेक मनू सिंघवी

वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा हवाला देत सांगितले की, रिमांड फक्त ठरावीक खटल्यातच दिली जाते. या खटला पुराव्याच्या छेडछाडीचा नाही. सीबीआयने टेम्परींग अथवा पुरावा मिटवण्या संदर्भात काही म्हटलेलं नाही.