Home News Update …तर शेती करेन- इंदुरीकर महाराज

…तर शेती करेन- इंदुरीकर महाराज

Support MaxMaharashtra

मुलगा होण्यासाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला किर्तनात मांडल्या प्रकरणी इंदुरीकर महाराजांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आता यावरुन इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) चांगलेत संतापले आहेत. दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं अशी सारवासारव त्यांनी आता केली आहे.

आता ही टीका थांबली नाही तर कीर्तन सोडून शेती करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते परळीमध्ये बोलत होते. मुलगा होण्याबाबत आपण जे काही बोललो ते धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. पण त्यावरुन एवढा वाद झाला याचा आपल्याला त्रास होतोय असंही त्यांनी म्हटलंय.

सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य त्यांनी आपल्या एका किर्तनात केले होते. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्याचं उल्लंघन असल्याचं सांगत त्यांच्यावर कारवाईचा इशारा यासंदर्भातल्या समितीने दिला आहे.

'काड्या करणाऱ्या युट्युबवाल्यांनी इंदुरीकर संपवला'वादग्रस्त वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कीर्तनातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. येत्या २-३ दिवसांत फेटा खाली ठेऊन शेती करणार असल्याचं अहमदनगर जिल्ह्यातील एका कीर्तनात त्यांनी सांगितलं.#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शनिवार, 15 फ़रवरी 2020

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997