Home News Update लोकशाही निर्देशांकातही भारताची घसरण

लोकशाही निर्देशांकातही भारताची घसरण

Support MaxMaharashtra

‘द इकोनॉमिस्ट’ ने प्रसिध्द केलेल्या जागतिक लोकशाही निर्देशांक अहवालात भारताचं स्थान खाली घसरलंय. या निर्देशांकाद्वारे जगातील देशांमधील लोकशाहीचं मूल्यमापन होत असतं. ‘द इकानॉमिस्ट’ने मंगळवारी १६५ देशांचा अहवाल जाहीर केला. यावर्षी निर्देशांकात भारताची १० जागांनी घसरण झाली असून १६५ देशांच्या यादीत आता भारत ५१व्या क्रमाकांवर आलाय. २०१८ मध्ये या निर्देशांकात भारत ४१ व्या क्रमांकावर होता. त्यावेळी भारताला ६.९ गुण मिळाले होते.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणे, नागरिकत्व सुधारणा कायदा यामुळे भारतीय नागरिकांच्या सामाजिक स्वातंत्र्यावर काहीशी बंधने आली आहेत म्हणूण या निर्देशांकात भारताची पत खालावली आहे. गेल्या १३ वर्षातील देशाची ही सर्वात मोठी घसरण आहे.

कुठल्या निकषांवर मूल्यांकन होते?

देशांतील निवडणूक प्रक्रिया, सरकारची कार्यप्रणाली, राजकीय भागीदारी, राजकीय संस्कृती आणि देशातील सामाजिक स्वातंत्र्य या पाच मुद्यांवरुन लोकशाहीच्या स्थितीचं मूल्यमापन केले जाते. यामध्ये ८ पेक्षा जास्त गुण मिळालेल्या देशाचा समावेश संपूर्ण लोकशाही देशांमध्ये होते. तर ६ ते ८ गुण मिळवलेल्या देशांना दोषपूर्ण लोकशाही यादीत तर ४ ते ६ गुण मिळवलेल्या देशांना मिश्र राजवट या यादीत समाविष्ट केले जाते. तर शून्य ते ३ गुण मिळालेल्या देशांना हुकुमशाही देश मानले जाते.

भारताला आता दोषपूर्ण लोकशाही असलेल्या देशांच्या यादीमध्ये टाकण्यात आलंय. २००६ पासून इकोनॉमिस्ट दरवर्षी हा अहवाल जारी करते. य़ा माध्यमातून जगातल्या १६५ देशात लोकशाहीची काय परिस्थिती आहे याची कल्पना येते.

भारतात सुधारीत नागरिकत्व कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व कायद्याविरुध्द झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २५ आंदोलक ठार झालेत. या गोळीबारामुळे उत्तरप्रदेश पोलीस आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. मात्र तरीही केंद्र सरकारने देशात हा कायदा लागू केलाय.

हे ही वाचा

शाहीर संभाजी भगतचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

FACT CHECK : शिवभोजनासाठी आधारकार्डची गरज आहे का?

पहिल्या टप्प्यात नाईटलाईफ मर्यादित ठिकाणीच

लोकशाही निर्देशांकात नॉर्वेने पहिला क्रमांक मिळवलाय. तर आइसलँड, स्विडन हे देश अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलँड चौथ्या, फिनलँड पाचव्या, आयर्लंड सहाव्या, डेन्मार्क सातव्या, कॅनडा ८ व्या, ऑस्ट्रेलिया ९ व्या,तर स्वित्झर्लंड १०व्या क्रमाकांवर आहे.

या निर्देशांकात पाकिस्तान १०८ व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेला ६९ तर बांग्लादेशला ८० व्या क्रमांकावर स्थान मिळालंय. १६५ देशांच्या यादीत चीन तळाला म्हणजे १५३ क्रमांकावर आहे तर उत्तर कोरीयावे तळ गाठलाय.

लोकशाही निर्देशांकात भारताचं घसरतं स्थान

२००६- ८.६८
२००८- ७.८
२०१०- ७.२८
२०११- ७.३
२०१२- ७.५२
२०१३- ७.६९
२०१४- ७.७४
२०१६- ७.८१
२०१७- ७.२३
२०१८- ७.२३
२०१९- ६.९

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997