का वाढत आहे बेरोजगारी?

का वाढत आहे बेरोजगारी?

देशातील आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पाऊलं उचलली आहेत. शिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहताना जागतिक अर्थव्यवस्थेकडे पाहणं देखील गरजेचं आहे. वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासदराने गेल्या अनेक वर्षांतला नीचांक गाठला आहे. GDP दर वाढीचे आकडे आले तेव्हा कळलं की भारताचा विकास दर आणखी घसरलाय. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकासदर ५% होता, जो गेल्या आर्थिक वर्षातल्या शेवटच्या तिमाहीत ५.८% इतका झाला आणि तो आता ५ % टक्यावर येऊन पोहोचलाय. ज्या अर्थाने देशाचा जीडीपी ढासळला आहे.
याचा अर्थ देशाचं औद्योगीक उत्पन्न कमी झालं आहे. ज्या हातानं औद्योगिक उत्पादन तयार केली जातात. त्या हाताचं देखील काम गेलं आहे. बेरोजगारी वाढली आहे… एकूणच बेरोजगारीचा आणि मंदीचा काय परिणाम होईल? याचं सखोल विश्लेषण जाणून घेऊया जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडून