Home मॅक्स ब्लॉग्ज संविधानाचा प्रसार आणि पर्यावरण रक्षणाचा निर्धार

संविधानाचा प्रसार आणि पर्यावरण रक्षणाचा निर्धार

214
0
Courtsy : Social Media
Support MaxMaharashtra

सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे हा उपक्रम येत्या प्रजासत्ताक दिनापासून (Republic Day)अर्थात २६ जानेवारी २०२० पासून महाराष्ट्रातल्या (Maharashtra) सर्व शाळांमध्ये सुरू होतोय दिवसाची सुरुवात करताना.

परिपाठाच्या वेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी असा आदेश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना जारी केला आहे. सोबत पर्यावरण (environment) रक्षणाचा निर्धार व्यक्त करणारी शपथ शाळा शाळांतून घेतली जाणार आहे.

वास्तविक संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करावे हा नवीन निर्णय नसून ४ फेब्रुवारी २०१३ रोजी शालेय शिक्षण विभागाने त्यासंबंधीचे परिपत्रक काढलेले होते परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कारकिर्दीत त्या आदेशांची अंमलबजावणी राज्यात झालेली दिसून आली नाही यंदा प्रजासत्ताक दिनी त्या देशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश शासनाने नव्याने जारी केले आहेत

नव्या आदेशात शासन म्हणतं की, भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वे व त्यातील सर्वसमावेशकता सर्व भारतीय नागरिकांना समजावी तसेच संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत, यासाठी भारतीय संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे.

संविधानातील मूलतत्वे, संविधानिक हक्क व कर्तव्ये भारतीय नागरिकांना संस्कारीत करणारी आहेत, त्यामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर संविधानिक मूल्यांची रुजवणूक झाल्यास सुजाण, जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल.

या शिवाय, प्रजासत्ताक दिनापासून पर्यावरणाच्या रक्षणाचा निर्धार शासनाने घोषित केला असून, स्वागत प्रजासत्ताक दिनाचे, ध्येय समृध्द पर्यावरणाच्या रक्षणाचे या शीर्षकाखाली पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचा उपक्रम शाळांना आखून दिला आहे. स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रजासत्ताक दिनी मंत्रालयात ही शपथ घेणार आहेत.

स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे, ध्येय समृध्द पर्यावरणाच्या रक्षणाचे

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आज संकल्प व निश्चय करतो/करते कि

माझ्या दैनंदिन जीवनशैलीत मी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेईन.

याकरिता प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करेन.

पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. त्याची बचत करेन.

घरातील ओला व सुका कचरा वेगळा करेन. ओल्या कचर्‍याने सेंद्रिय खत करीन.

माझ्या सभोवतालच्या नैसर्गिक जलस्रोतांचे म्हणजे, विहिरी, तळे, नदी अशा पाणवठ्यांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन.

मी असे वचन देतो की नैसर्गिक अधिवासात वास्तव्य करणारे प्राणी, पक्षी, जलचर व जैवविविधता यांचे मी संरक्षण करीन.

आम्ही असा संकल्प करतो की समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरिता मी वाढदिवसाला किमान एक झाड लावीन व त्याचे नित्यनियमाने संगोपन करेन.

आम्ही भारतीय प्रजासत्ताकाचे सर्व विद्यार्थी व सर्व सुजाण नागरिक शपथ घेतो की आजपासून आम्ही पर्यावरणपूरक दैनंदिन जीवन व्यतीत करण्याचा निश्चय करीत आहोत.

असा शपथेचा नमूना सर्व शाळांना पाठवण्यात आला आहे. ‌

हे ही वाचा…

काश्मीर मुद्द्यावर मदत करण्यास तयार : डोनाल्ड ट्रम्प

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याच्या सूत्रधाराला शिक्षा कधी?

महिला सक्षमीकरणाचा ओडिशा पॅटर्न

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997