अमित शाह खोटं पण रेटून बोलतात : सुप्रिया सुळे

अमित शाह खोटं पण रेटून बोलतात : सुप्रिया सुळे

loksabha, section 370, अमित शाह, सुप्रिया सुळे, amit-shah, supriya sule
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोलापूर येथे सांगता झाली. आज सोलापूर येथे झालेल्या या दुसऱ्या टप्प्याच्या सांगता सभेला देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते. यावेळी सोलापूर येथील सभेत बोलताना अमित शाह यांनी कलम 370 वरुन विरोधकांवर हल्लाबोल केला.
आज अमित शाह यांनी आपल्या संपूर्ण भाषणात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. जाहीर सभेत अमित शहा यांनी ३७० कलमावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या विरोधात मतदान केल्याचा दावा केला होता.
शहा यांची सभा संपताच सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना शहा हे खोटं बोलत असल्याचा दावा केला. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याविरोधात मी मतदानचं केलं नाही. मी ३७० कलमाच्या मतदान प्रक्रियेत भागच घेतला नव्हता. कुणीही संसेदचं रेकॉर्ड पाहू शकतात. शहा खोटं बोलत आहेत, असं सुळे यांनी सांगितलं. अमित शाह हे खूप खोटं बोलतात आणि ते रेटून खोटं बोलतात. त्यामुळे ३७० कलमवरून आगामी काळात शहा आणि राष्ट्रवादी असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.