मोहन भागवतांच्या नेतृत्वात मी बॉम्बस्फोट घडवले!

मोहन भागवतांच्या नेतृत्वात मी बॉम्बस्फोट घडवले!

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत. तरी दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा खळबळजनक खुलासा आंध्रप्रदेशातील संघाचे माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी केला आहे. या संदर्भात दैनिक लोकसत्ता च्या ऑनलाईन आवृत्तीने वृत्त दिलं आहे.
तत्कालीन सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. संघाने आजवर अनेक अतिरेक्यांना जन्म दिला आहे. देशभक्तीच्या नावावर आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हाताने अनेकांचा बळी गेला. असल्याचं खळबळजनक विधान पी विजय शंकर रेड्डी यांनी केलं आहे.
काय म्हटलंय वृत्तात?
मी बारा वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केले. या दरम्यान अनेक अनुचित गोष्टी घडल्या. ज्या चुकीच्या होत्या याची जाणीव मला झाली आणि मी संघाला रामराम ठोकला. बॉम्बस्फोटासारखे कृत्य संघाने केले असून मी देखील त्याचा एक भाग होतो. माझ्याजवळ या संदर्भातील सर्व पुरावे आहेत. संघाने माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला केला आहे. संघाचा काळा चेहरा समोर आण्यासाठी मी ‘मी देशभक्त के नाम पर आरएसएसके काले कारनामे’  हे पुस्तक काढले आहे. संघाचे काम असहाय्य झाल्याने काहींनी विष घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या देखील केली आहे. असे निराश झालेले अनेक प्रचारक माझ्या संपर्कात आहेत. अशांना घेऊन मी  लवकरच दिल्ली येथे  संघातील बढय़ा नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार आहे. यासंदर्भात मी सरसंघचालक यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचेही विजय शंकर यांनी म्हटल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.