कर्करोगाशी लढाई करून 11 महिने 11 दिवसांनी ऋषी कपूर परतले मायदेशी

कर्करोगाशी लढाई करून 11 महिने 11 दिवसांनी ऋषी कपूर परतले मायदेशी

Home sweet home! Rishi Kapoor and Neetu Kapoor are all smiles as they are back to the bay
Courtesy : Social Media

  ऋषी कपूर वर्षभरापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. बराच काल आपल्या घरापासून दूर असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या भावनांना वाट करुन दिली होती. या काळात घरच्या आठवणीने ते अनेकदा हळवे झालेले दिसले. अनेक ट्वीटमध्ये त्यांनी ही भावना बोलून दाखवली होती.  याशिवाय आजारपणाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नी नीतू यांच्याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिले होते. ‘या कठीण काळात नीतू माझा आधार स्तंभ होती. मी तिचा खूप आभारी आहे,’ असे त्यांनी म्हटले होते. ऋषी कपूर न्यूयॉर्कला असताना त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. आजारपणामुळे ऋषी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नव्हते’.

    11 महिन्यांनी मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. नीतू सिंग आणि ऋषी कपूर या दोघांनी हातात हात घालून कॅमेराऱ्याला पोज दिली, नंतर ते आपल्या गाडीत बसून घराकडे रवाना झाले.  त्यानंतर त्यांनी ट्विटरवरून, “अकरा महिने अकरा दिवसांनी घरी परतलो.. सर्वांचे आभार” अशा आशयाचे ट्विट केले.