मुंबईत अतिवृष्टीचा इशारा! शाळांना सुट्टी तर सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा! शाळांना सुट्टी तर सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन

42
0

मुंबई आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी तीव्र आणि काही ठिकाणी अतितीव्र पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या अनुषंगाने सावधगिरीचा उपाय म्हणून राज्य शासनाने आज मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आलंय.

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सांताक्रूझ परिसरात गेल्या २१ तासांत ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर नवी मुंबईत १० वर्षातील सर्वात जास्त पाऊस कोसळला आहे. १९ आणि २० सप्टेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे.