Covid19 ची लस कशी तयार होते?: डॉ संग्राम पाटील

जगभरात कोरोनामुळं लाखो लोकांचे जीव जात आहेत. तरीही अद्यापपर्यंत कोरोनावर कोणताही प्रभावी इलाज सापडलेला नाही. अनेक देशांनी कोरोनावर औषधं सापडल्य़ाचा दावा केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही देशाला पुर्णपणे य़श आलेलं नाही.

भारताने देखील कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. मुळच्या हैदराबाद येथील असणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीनं कोव्हॅक्सिन COVAXIN ही लस विकसीत केल्याचा दावा केला आहे. आता लसीचा प्रयोग मानवावर करण्यास परवानगी मिळाली आहे. आयसीएमआर आणि National Institute of Virology (NIV) यांचंही या लसीमध्ये योगदान आहे.

मात्र, लस नक्की कशी तयार केली जाते? त्य़ाची प्रक्रिया कशी असते? या संदर्भात इंग्लंड येथील डॉ. संग्राम पाटील यांनी केलेलं विश्लेषण नक्की पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here