Home > News Update > कोरोनाचं संकट : महाविद्यालयीन परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाचं संकट : महाविद्यालयीन परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाचं संकट : महाविद्यालयीन परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय
X

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर ९ आणि ११वीच्या परीक्षाही रद्द केल्या गेल्या आहेत. पण आता राज्य सरकारनं महाविद्यालयीन परीक्षांबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सरकारने अखेर दहावीचा भूगोलाचा पेपर, तसंच नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पण महाविद्यालयीन परीक्षांबाबत सरकारनं निर्णय़ घोषित केला नसल्याने या परीक्षांचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, महाविद्यालयीन परीक्षा रद्द होणार नाहीत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावर चार विद्यापीठांच्या कुलगुरुंची समिती अभ्यास करत आहे. या समितीच्या शिफारशीवरुन परीक्षा केव्हा आणि कुठल्या कालावधीत, कशाप्रकारे घ्यायच्या याचा अंतिम निर्णय़ राज्यपाल घेतील, असंही सामंत यांनी सांगितले आहे.

या परीक्षा ऑनलाईन किंवा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घ्यायच्या का यावरही विचार केला जात आहे. पण कोणत्याही परिस्थीतीत परीक्षा होणारच असं सामंत यांनी सांगितले आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास राज्यपालांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 13 April 2020 1:39 AM GMT
Next Story
Share it
Top