Home > News Update > औरंगाबाद: रेल्वेखाली चिरडून 14 मजूर ठार...!

औरंगाबाद: रेल्वेखाली चिरडून 14 मजूर ठार...!

औरंगाबाद: रेल्वेखाली चिरडून 14 मजूर ठार...!
X

सध्या कामगारांनी त्यांच्या घरी जाण्यासाठी असणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या, तसंच बसेस बंद आहेत. कोरोना व्हायरस मुळे जवळ जवळ दीड महिन्यांपासून ते राज्यातील विविध ठिकाणी अडकले आहेत. शुक्रवार दिनांक 7 मेला रात्री औरंगाबाद येथील काही कामगार रेल्वे पकडण्यासाठी गावाकडे निघाले होते.

मात्र, यातील 14 कामगार माल गाडी खाली आल्यानं त्यांचा मत्यू झाला आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान हा अपघात झाला आहे. हे कामगार जालन्याच्या एसआरजी नावाच्या कंपनीत कामाला होते. भूसावळमधून रेल्वे सोडण्यात येत असल्याचं कळल्यानंतर ते रेल्वे रुळाच्या मार्गे भूसावळकडे जात होते. अशी प्राथमिक माहिती आहे.

देशात लॉकडाऊन असल्यामुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. त्यामुळं प्रवासानं थकलेल्या हे कामगार बदनापूर ते करमाडच्या दरम्यान रात्री सटाणा शिवाराजवळ रेल्वे रुळावरच झोपले. जालन्याहून औरंगाबादकडे आलेल्या मालगाडी चा त्यांना अंदाज न आल्यानं मालगाडी खाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात एका स्थानिक वृत्तपत्राने हे वृत्त दिलं आहे. यातील काही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Updated : 8 May 2020 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top