Home > हेल्थ > डिजायनर बेबी? अशक्य ते काय?

डिजायनर बेबी? अशक्य ते काय?

डिजायनर बेबी? अशक्य ते काय?
X

बायोटेक्नोलॉजीची अफाट नवनवीन कवाडं गेल्या काही वर्षात झपाटयाने खुलत आहेत. या बायोटेक्नोलोजीची कमाल आपण आपल्या दैनंदीन जीवनात बघत आहोत. जेनेटिकली बदल करुन निर्माण केलेली फळं, भाज्या, धान्य आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेले आहेतच. आकाराने मोठी फळं, गोड रसाळ फळं थोडक्यात म्हणजे जशी हवी तशी फळ आपणास बायोटेक्नोलोजी तंत्रज्ञाऩामुळे आता उपलब्ध आहेत. जास्त दूध देणारी म्हैस किंवा गाय, जास्त शक्तिशाली बैल, रेसिंगचे जास्त वेगाने धावणारे घोडेसुद्धा या तंत्रज्ञाऩाची कमाल आहेत.

मानवी शरीरात कुठले बदल करू शकते ही बायोटेक्नोलोजी?

खरे तर ही टेक्नोलोजी का्य करू नाही शकत नाही असे विचारणे जास्त संयुक्तिक ठरेल? मानवी स्वभावाचे शारीरिक अणि मानसिक गुणधर्म आपल्या रक्तातील DNA मधील जनुक किवा जीन्स ठरवित असतात. या जनुकांचा किंवा जीन्सचा एक डिजाईन पॅटर्न असतो. प्रत्येकाच्या शरीराचा DNA पॅटर्न हा आइवडिलांकडून जन्मजात त्याला/तिला मिळालेला असतो. पण कधी कधी गर्भात वाढ होत असतांना हे डिजाईन बिघडते अणि मग त्यातून शरीरिक व्यंग, मानसिक दौर्बल्य किंवा पालकांच्या कुटुंबामधे पिढीजात असलेले आजार घेउन बाळ जन्मास येते. बायोटेक्नोलॉजीचे वरदान म्हणजे गर्भात असलेल्या बाळामधे काही व्यंग असल्यास ते व्यंग दूर करता येऊन सुद्रुढ बाल जन्मास येऊ शकते.. थोडक्यात म्हणजे या बिघाड असलेले जीन्स बदलून किंवा त्यांच्या डिजाइन मधे बदल करून कुठलेही व्यंग किंवा विशिष्ट आजार टाळले जाऊ शकतात.

काही वर्षांपूर्वी ‘क्लोंनिंग‘ या बायोटेक्नीकल पद्धतीमधून एका शेळीचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण जग बायोइंजिनीयरिंग क्षेत्राच्या अमर्यादित आवाक्यामुळे विस्मयचकित झाले. चीनने नंतर कुत्रे अणि इतर प्राण्यांवर देखील असे यशस्वी प्रयोग केले. या टेक्नोलॉजीमुळे रक्ताचे सँपल मिळाल्यास नवा हिटलर सर्वगूणदोषांसाहित जसाच्या तसा पुर्नजन्म घेऊ शकतो इतकी याची शक्ती अमर्याद आहे. बायो इंजिनीयरिंगचे हे विस्मयकारक प्रयोग प्रयोगशाळेपुरते मर्यादित न रहाता ओसामा बिन लादेन सारख्या कुविख्यात अतिरेक्याने आपली स्वतःची प्रयोगशाला उभारून स्वता:चे क्लोन्स निर्माण केल्याच्या चर्चेमुळे पूर्ण जग धास्तावले होते. पुढे लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेने मारला तो खरा लादेन की त्याचा क्लोन याची खातरजामा सुद्धा केल्याचे रिपोर्ट्स आहेत. याकरिता अमेरिकेने त्याच्या रक्ताचे विविध नमूने घेऊन काही अत्याधुनिक चाचण्या करून मारल्या गेलेला लादेन खरा की क्लोन याची शहानिशा केली. जगभरात काही देशानी क्लोंनिंगचे संभाव्य धोके पाहता मानवावर या तंत्रज्ञाऩाचे उघड उघड प्रयोग करण्यास बंदी आणली तरी पण छुप्या पद्धतीने मोठमोठ्या फार्मा कंपनीज हे प्रयोग करीत आहेत. अणि चीन हा महाकाय देश तर यात आघाडीवर आहे. चीन सातत्याने बायोइंजिनीयरिंग वर संशोधन करीत राहिला आहे . या क्षेत्रात त्यांचे एकहाती वर्चस्व होऊ नये म्हणून मग इतर देशही आता हळूहळू संशोधन बंदी सबंधित नियम शिथिल करीत आहेत.

बायोइंजिनीयरिंगचे पुढचे पाउल म्हणजे 'डिजायनर बेबी '!

CRISPR या बायोइंजिनीयरिंग टेक्निकमुळे आता 'डिजायनर बेबी' जन्मास घालणे शक्य झाले आहे. 'डिजायनर बेबी' म्हणजे परफेक्ट बेबी! तुम्हाला हवे तसे बाळ म्हणजे परफेक्ट बाळ आता तुम्ही जन्मास आणू शकाल. एखाद्या फॅक्ट्रीमध्ये नविन प्रोडक्ट निर्माण केल्यासारखे किंवा रेस्टोरंट मधे मेन्यु बघून आवडती डिश ऑर्डर करण्यासारखे हे असणार आहे. तुम्हाला रंगाने गोरं बाळ हवंय किंवा अॅथलेटिक बाळ हवंय किंवा विशिष्ट उंचीचे बाळ हवंय किंवा न्यूटन सारखे बुद्धिमान बाळ हवे तर मग भारी किंमत मोजून हवे तसे बदल जिन्समध्ये करा अणि जन्माला आणा कल्पनेतील परफेक्ट बाळ. अशी ही अचाट संकल्पना आहे.

यापुढे असेही बालक जन्माला येऊ शकेल जे कुठल्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक किवा पिढीजात आजारांपासून मुक्त असेल किंवा अजुन पुढे जाऊन म्हणायचे झाल्यास सुपरपॉवर असलेले सुपरह्युमन बेबी जन्मास येऊ शकेल. ज्याची बुद्धिमत्ता अचाट असू शकते, त्याच्यामधे शंभर हत्तिंचे बळ असू शकेल, किंवा कँसर, थ्यालेसेमिया, अल्जैमर्ससारख्या जिवघेन्या रोगांविरोधात जन्मजात प्रतिकारशक्ती त्याच्यामध्ये असू शकेल, जो कधीच म्हातारा दिसू शकणार नाही किंवा कदाचित त्याला अमरत्व देखिल प्राप्त असू शकेल.

‘डिजायनर बाळ ‘ ही संकल्पना आजच्या घडीला श्रीमंत लोकांपूर्ती मर्यादित असली तरी नजीकच्या भविष्यात सर्वसामान्यांही ती सहज उपलब्ध होईल. मानवी शरीरातील हे बदल अनैसर्गिक अणि अनैतिक असून उत्क्रांती वादाचे सिद्धांत यामुळे पूर्णपणे बदलतील असे उत्क्रांतिवाद संशोधकांचे, मानवी अधिकारांच्या समर्थकांचे मत आहे. या बायोटेक्नोलोजीमुळे सेक्स विरहित प्रजोत्पादन होऊ शकते. म्हणजे सेक्स न करता कृत्रिम गर्भाच्या आधारे प्रयोगशाळेत मुले जन्माला घातली जाऊ शकतात. चीनमधे एप्रिलमध्ये तीन लोकांचे DNA एकत्र करुन बाळ जन्माला घातल्या गेले आहे. प्राण्यांवरील यशस्वी प्रयोगानंतर आता हे सिद्ध झाले आहे की दोन पुरुष देखिल आपले DNA अणि सेल एकत्र करून मुलांना जन्माला घालू शकतात.

स्त्रिशिवाय केवल एक पुरुषदेखिल आपले DNA अणि सेल यांचे मिलन करून मुले जन्माला घालू शकेल. अगदी काल परवाच कृत्रिम गर्भ विकसित झाल्याचे प्रकाशित झाले आहे. यामुळे स्त्रीविना बाळ जन्माला येऊ शकेल, किंवा स्त्रीला स्वत:ला नऊ महीने बाळ पोटात ठेवण्याची गरज उरणार नाही. एक संभाव्य धोका म्हणजे डिजायनर व्यक्तींचा शक्तीशाली समूह भविष्यात संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. अंतराळात स्त्रिगर्भाशिवाय बाळ जन्माला आणणया्‍‌चे चीनचे भरकस प्रयत्न सुरु आहेत.

चीनच्या बरोबरीने इंग्लैंड, फ़्रांस, अमेरिकेसारखे प्रगत देश देखिल बायोइंजीनियरिंग मधील संशोधनाने पुरते पछाड़लेले असून एकमेकांवर वर्चस्व स्थापण्याची जीवघेणी स्पर्धाच जणू त्यांच्यामधे लागलेली आहे. तीन पैकी एका प्रयोगाला सध्या यश मिळत आहे. संपूर्ण जग बायोइंजिनीयरिंगच्या बाजूने किंवा विरोधात वाटले गेले आहे अशी परिस्थिती आहे. निसर्गाच्या जैविक नियमांच्या विरोधात जाऊन असे प्रयोग करणे योग्य की अयोग्य याबद्दल बरीच चर्चाचर्वन होत आहेत. या जैविकक्रांतीचे परिणाम काय आणि कसे होतील यावर जागतिक विचारमंथन होत असली तरी हेही तितकेच खरे की प्रगत देशांच्या राक्षसी महत्वाकांक्षांपुढे हे जग सध्या झूकलेले आहे

Updated : 12 May 2017 7:34 AM GMT
Next Story
Share it
Top