Home > हेल्थ > आयुर्वेद : समज-गैरसमज

आयुर्वेद : समज-गैरसमज

आयुर्वेद : समज-गैरसमज
X

वर्तमान युग हे ग्लोबलायाझेशानाचे युग आहे असे म्हंटले जाते. अनेक संस्कृतींची आकर्षक विचारधारांची सरमिसळ आज आपल्या वाट्याला येत आहे. आयुर्वेदसुद्धा या पद्धतीनं ग्लोबल होत आहे. आयुर्वेद अबाधित आहे. कारण त्यातील सर्व प्रिन्सिपल्स त्रिकालाबाधित आहेत. आयुर्वेद अनादी, स्वभावासंसिद्ध आणि स्वभावानित्य असल्याने शाश्वत आहे. परंतु आयुर्वेद समजून घेण्याचेही एक शास्त्र आ कौश्यल्य आहे. शास्त्रासाहीत तर्क हेच चिकित्सकाचे सर्व श्रेष्ठ साधन आहे. याच शास्त्राच्या आधारावर बरेचसे वैद्यराज आता रूढ औषधांच्या वापराची नवी पद्धती, आयुर्वेदाच्या सिद्धांताच्या नवीन दृष्टीकोणातून विचार याचबरोबर आयुर्वेद शास्त्राचा प्रत्यक्षात यशस्वीपणे उपयोग करण्याच्या दृष्टीकोणातून केलेला अभ्यास, सूत्ररूप ग्रंथांकन ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची हातोटी या सर्व गोष्टींचे संस्कार करून आता आयुर्वेदाची चिकित्सा केली जाते.

आपण जे आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र यांची तुलना करतो, तो विचारच मुळात चुकीचा आहे. कारण शास्त्र हे शास्त्र असते. नवीन गोष्टींचा स्वीकार करण्याने आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतामध्ये तिळमात्र फरक पडत नाही.

आधुनिक शास्त्राचे सिद्धांत नेहमी बदलत राहतात. त्यांचे मूळ सिद्धांत बऱ्याचदा चुकीचे म्हणून सिद्ध केले जातात. काही लोक ते सिद्धांत बरोबर आहेत म्हणून सांगतात. उदा. आता बऱ्याच प्रमाणावर वापरली जाणारी disprin ही गोळी काही कालावधीसाठी वापरू नये असे सांगितले गेले. आणि नंतर नवीन सिद्धांतानुसार ती खूप उपयुक्त आहे असे सिद्ध केले गेले. या सर्व गोष्टी प्रायोगिक तत्वांवर रुग्णांवर वापरल्या जातात. परंतु रुग्ण बऱ्याचदा गोंधळामध्ये असतात आणि अंधापणाने एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्या पद्धतीचा अवलंब करतात. ऍलोपॅथी एक शास्त्र आहे. प्रत्येक वेळी त्यामुळे नवीन सुधारणा येत राहतात. परंतु हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले अथर्ववेदातील आयुर्वेदाचे सिद्धांत आता एक-एक करून सिद्ध होत आहेत. नवीन गोष्टींच्या आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आयुर्वेद शास्त्राचा वापर करून रुग्णांना त्या प्रकारे चिकित्सा करू शकतो. विकार जे शस्त्रसाध्य असतात त्यासाठी सुद्धा आयुर्वेदाच्या शल्य तंत्रापासून आधुनिक शास्त्रात surgery विभागाची उन्नती झाली आहे ते आयुर्वेदाचार्य सुश्रुताचार्यांमुळेच झाली आहे. परंतु सदर गोष्टीची माहिती सामान्य जनतेला नाही. जर्मनीच्या एका मोठ्या विद्यापीठाच्या बाहेर सुश्रुताचार्यांचा मोठा पुतळा आहे. परंतु सुश्रुताचार्यांचे नाव आपल्या माणसांना माहीतच नाही. ही खूप मोठी खंत आहे. आज बऱ्याचदा कोस्मेटिक्समध्ये आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो. स्पा या सोज्ज्वळ नावाखाली आयुर्वेदिक उपचार केले जातात. बरेचसे आलोपॅथिक डॉक्टर सुद्धा आयुर्वेदिक औषधे वापरू लागले आहेत.

आपण गाडीची सर्विसिंग नेहमी करतो कारण त्यामध्ये बिघाड होऊ नये. परंतु शरीररूपी गाडीची सर्विसिंग करायला आपल्याकडे वेळच नसतो. कारण आपल्याकडे सगळीच कारणे असतात. आपली गाडी एकदा बिघडली की Garage मध्ये टाकायची, लाखो रुपये खर्च करायचे. परंतु सर्विसिंग साठी येणारा खर्च लाखो पटीने कमी असतो, याचा विचार सामान्य माणसे करत नाहीत.

आपल्या नशिबाने एक शास्त्र आपल्याला आजार होऊच नयेत, कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा, वर्षानुवर्षे तारुण्य आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी सांगते त्याकडे आपण दुर्लक्ष करतो याचे कारण म्हणजे सामान्य माणसं आयुर्वेदाकडे एक शास्त्र म्हणून बघतच नाहीत. त्यांच्या मते आयुर्वेद म्हणजे झाड-पाल्याची औषधे, उशिरा गुण देणारी चिकित्सा पद्धती, आधुनिक चिकित्सा पद्धतीने गुण न आल्यास प्रायोगिक तत्वावर करण्याची उपचार पद्धती असंच आहे. परंतु आयुर्वेदात फक्त आजार झाल्यावर उपचार न करता, आजार होऊच नये यासाठी काय करू शकतो, या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे.

आयुर्वेदाकडे एक शास्त्र म्हणून बघितले तर त्यामुळे आपल्या शरीरावर व मनावर चांगले संस्कार होतील आणि याचा येणाऱ्या पिढीवर चांगला परिणाम होईल कारण "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" असे सांगितले आहे ते खरेच आहे.

त्यामुळे आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे. आजच संकल्प करू, डोळे उघडून आपल्या आयुष्यावर एक चांगला संस्कार करू...

डॉ.सतीश सूर्यवंशी

8433723567

Updated : 27 April 2017 7:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top