गडकिल्ले भाड्याने द्यायला ती तुमच्या बापाची जहागीर नाही; हार्दिक पटेल संतापला

गडकिल्ले भाड्याने द्यायला ती तुमच्या बापाची जहागीर नाही; हार्दिक पटेल संतापला

राज्यातील किल्ले खासगी विकासकांना कंत्राट पद्धतीवर देण्याच्या निर्णयावर राज्यात वातावरण ढवळून निघत आहे. त्यात आता गुजरातमधला पटेल समुदायाचा नेता हार्दिक पटेल याने उडी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारवर टीका करत गडकिल्ले भाड्याने द्यायला ते काय तुमच्या बापाची जहागीर आहे आहे का असा सवाल हार्दीकने केलाय.
मराठीमध्ये ट्विट करून हार्दीकने या निर्णयावर आपला संताप व्यक्त केला. एवढीच भीक लागली असेल तर मंत्र्यांचे बंगले, मंत्रालय आणि राजभवन भाड्याने द्या असा खोचक सल्लाही त्याने दिलाय.