Home News Update CAA : लोकांना घाबरवून कायदा लागू करता येत नाही – सुभाष चंद्र...

CAA : लोकांना घाबरवून कायदा लागू करता येत नाही – सुभाष चंद्र बोस यांच्या नातवाची भाजपवर टीका

grandson-of-netaji-subhash-chandra-bose-speaks-on-caa-the-law-cannot-be-enforced-by-intimidation
Courtsy : Social Media
भाजपचे पश्चिम बंगाल चे उपाध्यक्ष आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नातू चंद्र के. बोस यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मुस्लीम समाजाचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामध्ये CAA समावेश करण्याची मागणी केली आहे.
कोणताही कायदा नागरिकांना घाबरवून  लागू करता येऊ शकत नाही. आंदोलकांवर टीका करण्यासाठी तुम्ही अपमानजनक शब्द वापरु शकत नाहीत. जे आंदोलन पूर्ण भारत भर सुरु आहे. हे आंदोलन खूपच सहजरित्या सोडवलं जाऊ शकत. फक्त सरकारने स्पष्ट रुपाने घोषणा करायला हवी की, प्रत्येक हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन समाजाला नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात समान रुपाने नागरिकत्व मिळेल.
यावेळी बोस यांनी पश्चिम बंगाल मधील भाजप नेत्यांवर देखील निशाणा साधला. भाजपच्या नेत्यांनी या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या बुद्धीजीवी आणि प्रसिद्ध व्यक्तींवर विवादास्पद वक्तव्य केली होती. यावर बोस यांनी संताप व्यक्त केला आहे.
Support MaxMaharashtra

 

 

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997