शासकीय कर्मचारी संप तूर्त स्थगित; तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून पुन्हा बेमुदत संपावर...

शासकीय कर्मचारी संप तूर्त स्थगित; तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार

सौ. इंटरनेट
समन्वय समितीने घोषित केल्याप्रमाणे सोमवारी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. काम बंद ठेऊन राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी मोठं मोठे मोर्चे काढले. मुंबईत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर व समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेतून कोणताही ठोस ठराव झाला नाही.
त्यानंतर ही समन्वय समिती निमंत्रक वितेश खांडेकर, विजय बोरसे व त्यांचे सहकारी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याने सरकारने त्यांना बुधवारी पुन्हा चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे बुधावरचा संप स्थगित करण्यात आला आहे. गुरुवारी गणेश विसर्जन सुट्टी असून बुधवारी जर शासनाने सकारात्मक तोडगा काढला नाही तर हा संप शुक्रवार पासून पुन्हा सुरू राहील अशी माहिती राज्य प्रवक्ते जगदीश ओहोळ यांनी दिली.
सरकार संप फोडण्याचा प्रयत्न करत आहे
आमच्याशी कोणतीही चर्चा न करता, आमच्या परस्पर सरकारशी संलग्न असणाऱ्या संघटनांना हाताशी धरून, चर्चा घडवून सरकार हा संप फोडण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप संप घोषित करणाऱ्या समन्वय समितीचे निमंत्रक वितेश खांडेकर व सुनील दुधे यांनी केला आहे.