पंकजा मुंडेंचा निवडणुकीच्या तोंडावर नवा डाव

पंकजा मुंडेंचा निवडणुकीच्या तोंडावर नवा डाव

Courtesy : Social Media
बीड जिल्हा हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयात ऊस तोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आगामी निवडणुकांच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने ऊस तोड कामगारांची मोठी मागणी पूर्ण केली आहे.
महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा आदेश निर्गमित केला असून महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशव आंधळे यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पंकजा मुंडे यांनी ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ’ स्थापना करून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. बीडमध्ये ऊस कामगारांची संख्या जास्त असल्याने पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे.
बीडमध्ये अनेक कुटूंब उदर्निर्वाहासाठी ऊस तोडीवर अवलंबून असतात. ऊसतोड कामगारांच्या न्याय आणि हक्कासाठी त्यांच्या सोबत उभे राहण्याच्या दृष्टीने या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी ऊसतोड कामगार नेते म्हणून ओळख असणारे माजी आमदार केशव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महामंडळा करिता आकस्मिकता निधीमधून १४५ कोटी इतका निधी मंजूर करण्यात यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या महामंडळा करिता आकस्मिकता निधीमधून १४५ कोटी इतका निधी मंजूर करण्यात यावं असं या आदेशात नमूद करण्यात आले आहे.