आजपासून बेस्टच्या तिकीट दरात कपात

आजपासून बेस्टच्या तिकीट दरात कपात

बेस्टच्या प्रवाशांना आज मंगळवार पासून तिकीट दरात कपात झाल्यामुळे खिशाची झळ कमी झाल्याचा अनुभव येणार आहे. मुंबई पालिकेने बेस्ट च्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय अंमलात आणला आहे. त्यामुळे प्रवाशांना किमान प्रवासासाठी फक्त पाच रुपये आणि भविष्यात दाखल होणाऱ्या वातानुकुलीत बसच्या किमान प्रवासासाठी सहा रुपये मोजावे लागतील. प्रतीदिवसाच्या पाससाठी साध्या बसचा ५० रु. व वातानुकुलीत बसचा  ६० रु. असा दर राहील. सोबतच मासिक पासमध्येही दर कपात होणार आहे.

बेस्टने यापूर्वी प्रवास दरात कपात करण्याची महत्त्वाची घोषणा केली होती. त्यास सोमवारी राज्य सरकारनेदेखील संमती दिली आणि बेस्टने त्या अंमलबजावणीचा निर्णय लागू केला.या निर्णयाला अनुसरून बेस्ट समिती आणि पालिका सभागृहापाठोपाठ आता राज्य परिवहन प्राधिकरणानेही नुकतीच मंजुरी दिली होती. ही तिकीट दर कपात कधी अमलात येणार याची वाट पाहत असतानाच काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही मंजूरी दिली आहे.

बेस्टच्या प्रवासी संख्येमध्ये प्रतिदिवस २५ ते ३० लाखांपर्यंत घट झाली आहे. ही प्रवासी संख्या ५० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवत बेस्टने ताफ्यात वाढ करण्याच्या निर्णयासह तिकीट दरकपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.

असा असेल तिकीट दर :

नवीन तिकीट दर  (प्रतिदिन)

कि.मी. साधी बस वातानुकुलीत बस
५ कि.मी. ५ रु. ६ रु.
१० कि.मी. १० रु. १३ रु.
१५ कि.मी. १५ रु. १९ रु.
१५ कि.मी.पुढे २० रु. २५ रु.

 

नवीन बसपास दर

 

अंतर      साधी बस  वातानुकुलीत  बस
कि. मी. मासिक त्रैमासिक मासिक त्रैमासिक
२५० रु. ७५० रु. ३०० रु. ९०० रु.
१० ५०० रु. १५०० रु. ६५० रु. १,९५० रु.
१५ ७५० रु. २,२५० रु ९५० रु. २,८५० रु.
१५ कि.मी. पेक्षा अधिक १,००० रु. ३,००० रु. १,२५० रु. ३,७५० रु.